आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाराजी:नव्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा आढावा रोज घेणार; केंद्रेकरांचे आदेश

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरासाठी होणाऱ्या नव्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा दररोज आढावा घ्यावा, असे आदेश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना बुधवारी दिले.बैठकीला जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, पालिकेचे प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्यासह महापालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महावितरण, वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

सूत्रांनुसार विभागीय आयुक्तांनी पाणी योजनेच्या कामाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. वारंवार सूचना करूनही कामाला गती का येत नाही, काम करण्यात तुम्हाला रस आहे की नाही असा सवाल त्यांनी कंत्राटदाराच्या प्रतिनिधींना केला. जॅकवेल, मुख्य जलवाहिनी, जलकुंभांचे बांधकाम, जलशुध्दीकरण केंद्रांचे बांधकाम, अंतर्गत वितरण वाहिन्या अशी सर्व कामे माइस्टोननुसार झालेली नाहीत. संथगतीने कामे सुरू आहेत. त्यामुळे दिलेल्या वेळेत काम करणे शक्य आहे की नाही असा प्रश्न त्यांनी विचारला. यावर कंत्राटदाराच्या प्रतिनिधींनी काम गतीने करून दाखवतो, ३१ जानेवारीपर्यंत वेळ द्या, अशी विनंती केली. या मुदतीचे पालन होईल का, असा प्रश्न केंद्रेकर यांनी केला.

अधिकाऱ्यांकडून पाणीपुरवठा कामाची प्रत्यक्ष पाहणी केंद्रेकर, पांडेय आणि चौधरी यांनी बुधवारी दुपारी पाणीपुरवठा योजनेच्या कामाची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. डॉ. चौधरी यांनी सांगितले की, ‘विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने पाहणी करून त्याचा अहवाल सादर करावा असे निर्देश खंडपीठाने दिले आहेत. या निर्देशानुसार पाहणी केली. बऱ्याच ठिकाणी अपेक्षेप्रमाणे काम झाल्याचे आढळले नाही.’

बातम्या आणखी आहेत...