आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकल्पचित्रास मान्यता:44 रस्त्यांची कामे महिनाअखेरीस सुरू होणार

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्मार्ट सिटीच्या पहिल्या टप्प्यातील २२ रस्त्यांची कामे आता पूर्णत्वास आली आहेत. दुसऱ्या टप्प्यातील ४४ रस्त्यांच्या यादीला स्मार्ट सिटीचे सीईओ डॉ. अभिजित चौधरी यांनी मंजुरी दिली आहे. आयआयटी मुंबई संस्थेकडून रस्त्याच्या संकल्पचित्रास मान्यता घेऊन महिनाअखेरीस कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. शहरातील १०९ रस्त्यांसाठी स्मार्ट सिटीतून ३१७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. स्मार्ट सिटीकडे ८० कोटींचा निधी उपलब्ध असल्यामुळे त्यातून पहिल्या टप्प्यात २२ रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली. रस्त्यांच्या कामाचे त्रयस्थ संस्थेमार्फत लेखापरीक्षण करण्यासाठी आयआयटी मुंबई या संस्थेची नियुक्ती केली. त्यानुसार त्यांनी पाहणी करून साहित्य वापरण्याबद्दल सूचना केल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...