आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 ते 15 कोटी खर्च करणार; वास्तुविशारदही नेमणार:शहरातील ऐतिहासिक स्मारकांची होणार कामे

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील ऐतिहासिक १० स्मारके आणि वारसास्थळांचे सौंदर्यीकरण, डागडुजी व इतर विकासकामे केली जाणार अाहेत. त्यासाठी सुमारे १० ते १५ कोटी खर्च करणार असून एका वास्तुविशारदाची देखील नेमणूक करण्यात येणार आहे. हा वास्तुविशारद स्मारके, वारसास्थळांची काेणती विकासकामे करावी?, यासंदर्भात प्रस्ताव तयार करून राज्य पुरातत्व विभागाकडे सादर करणार आहे. त्यानंतर राज्य पुरातत्व विभाग हा प्रस्ताव तयार करून महाराष्ट्र पुरातत्व संचालनालयाकडे पाठवणार आहे. काेराेनापूर्वी राज्य पुरातत्व विभागाने शहरातील स्मारके आणि वारसास्थळांच्या विकासकामांसाठी महाराष्ट्र पुरातत्व संचालनालयाकडे १० ते १५ कोटींचा प्रस्ताव सादर केला होता.

मात्र, कोरोना काळात हा प्रस्ताव मंजूर झाला नव्हता. त्यामुळे हा प्रस्ताव पुन्हा नव्याने तयार करण्याचे काम सुरू आहे. सध्या राज्य पुरातत्व विभागाने महाराष्ट्र पुरातत्व संचालनालय विभागाकडे एक वास्तुविशारद नेमणुकीसाठी १५ दिवसांपूर्वी प्रस्ताव सादर केला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर वास्तुविशारद नेमणार आहे. यासाठी राज्य पुरातत्व विभागाने निविदा मागवल्या असून, ५ वास्तुविशारदांनी निविदा सादर केल्या आहेत. हे वास्तुविशारद प्रत्येक स्मारके आणि वारसास्थळांची पाहणी करून विकासकामांचा प्रस्ताव तयार करणार आहे. त्यासाठी सुमारे १० ते १५ कोटी खर्च करण्यात येणार अाहे.या वारसास्थळांचा करणार विकास : सोनेरी महाल, मकई गेट, दिल्ली गेट, भडकल गेट, पाणचक्की, नऊखंडा पॅलेस, लाल मशीद, काळी मशीद, चौक मशीद, शहागंज मशीद.

पुढील पिढीला महत्त्व कळावे ^ऐतिहासिक स्मारके आणि वारसास्थळांचे जतन आणि संवर्धन करण्यात येणार आहे. पुढील पिढीला स्मारके आणि वारसास्थळांचे महत्त्व कळावे, यासाठी ही विकासकामे केली जाणार अाहेत. त्यासाठी १० ते १५ कोटी खर्च केले जाईल. -नितीन चारुडे, इंजिनिअर, राज्य पुरातत्व विभाग, सोनेरी महाल.