आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुण बेपत्ता:​​​​​​​पारोळा तलावाचा पुर पाहण्यासाठी गेलेला तरुण बेपत्ता, दोघे जण बचावले; पोलिस व नागरिकांकडून शोध कार्य सुरु

हिंगोली4 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

हिंगोली तालुक्यातील पारोळा तलावाचा पुर पाहण्यासाठी एक तरुण बेपत्ता झाल्याची घटना शनिवारी ता. 25 दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या दोघांना मात्र वाचविण्यात यश आले आहे. हिंगोली ग्रामीण पोलिसांचे पथक व नागरीकांच्या मदतीने त्यांचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील पारोळा येथे तलाव आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी आले असून तलावाच्या पुरात पोहण्यासाठी तरुणांची मोठी गर्दी झाली आहे. या शिवाय या ठिकाणी धबधबा तयार झाला असून त्या ठिकाणीही नागरीकांची गर्दी आहे.

तसेच पुराचे पाणी भांडेगाव मार्गावरील पुलावरून वाहू लागले आहे. या ठिकाणी आलेला पुर पाहण्यासाठी हिंगोली शहरातील रिसालाबाजार भागातील कुणाल बंडू खंदारे (17) हा पाण्यात पडून पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेला. त्याला वाचविण्यासाठी शिवम कैलास खंदारे व सचिन मधुकर शिंदे यांनी पुराच्या पाण्यात उडी मारली. त्यांनी कुणाल यास वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या प्रवाहा सोबत ते वेगाने वाहून गेला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते मिलींद उबाळे यांनी तातडीने हिंगोली ग्रामीण पोलिस ठाणे व तहसील कार्यालयास माहिती दिली.

त्यावरून ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक मळघने, जमादार संतोष वाठोरे, शेख महमद, तलाठी प्रदीप इंगोले यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस व गावकऱ्यांनी खांबाळा, सावा या शिवारात पाहणी सुरु केली आहे. मात्र अद्याप कुणालचा शोध लागला नाही. तर शिवम व सचिन दोघेहे सावा येथील पुलाला धरून थांबल्याने त्यांना वाचविण्यात यश आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, सेनगाव तालुक्यातील साखरातांडा येथे सावित्राबाई चव्हाण ही महिला आज सकाळी आकरा वाजता ओढ्याच्या पुरात वाहून गेली आहे. या महिलेचा सेनगाव पोलिसांनी शोध सुरु केला आहे.

बातम्या आणखी आहेत...