आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानपुरा पोलिसांनी केली तरुणाला अटक:मूल होताच तरुणीला सोडले; तरुण बाळ घेऊन झाला पसार

छत्रपती संभाजीनगर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीचे रूपांतर आधी मैत्रीत व नंतर प्रेमात होताच तरुणी प्रियकराला भेटण्यासाठी थेट पंढरपूरला गेली. काही दिवस पुणे व नंतर पंढरपूरला राहिल्यानंतर तिला मूल झाले. मात्र, मूल होताच तरुणाने तिला शहरात आणून सोडत बाळासह पोबारा केला. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिसांनी स्वप्निल दीपक खंकाळ (२७, रा. सिद्धार्थनगर, पंढरपूर, जि. सोलापुर) याला अटक करत बाळ तरुणीच्या ताब्यात दिले.

२३ वर्षीय तक्रारदार तरुणी उस्मानपुरा परिसरात राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करते. दीड वर्षापूर्वी तिची इन्स्टाग्रामवर स्वप्निलसोबत ओळख झाली होती. सुरुवातीला संवाद सुरू झाल्यानंतर मैत्री झाली व स्वप्निलने तिला लग्नाचे आश्वासन दिले. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवत तरुणीने शहर सोडले. यादरम्यान स्वप्निलने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून गर्भवती राहून तिने मुलीला जन्म दिला. परंतू स्वप्निलने तिच्याशी संबंध तोडले.

मुलीच्या ताब्यासाठी आई ठाण्यात; पोलिसांची मदत मुलीच्या ताब्यासाठी तरुणीने उस्मानपुरा पोलिसांकडे धाव घेतली. निरीक्षक गीता बागवडे यांनी तत्काळ पथकाला रवाना केले. स्वप्निलला पोलिसांनी पंढरपुरातून ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीतून मुलीला शोधून काढत तिला ताब्यात घेत पीडितेच्या ताब्यात दिले. स्वप्निलसह पीडितेला मारहाण करणाऱ्या रोहित शिवशरण याच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याचे बागवडे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...