आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:2 लाख 72 हजार रुपयांची चोरी; दोन आरोपींना 5 मार्चपर्यंत कोठडी

छत्रपती संभाजीनगर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्राध्यापिकेच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्य‍ाचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे २ लाख ७२ हजारांचा ऐवज चोरणाऱ्या दोघांना क्रांती चौक पोलिसांनी १ मार्च रोजी पहाटे अटक केली. या दोन चोरांना ५ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एम. आर. देशपांडे यांनी दिले. राजेंद्र ऊर्फ राजन बाबासाहेब राऊत (राजू बाबूराव मुचकुले, २६) आणि ओम फकिरा पवार (२०, दोघे रा. साईनगर, ता. परतूर, जि. जालना) अशी आरोपींची नावे आहेत.

चैतन्य रेसिडेन्सी (शक्तिनगर, सीबीएस रोड) येथे राहणाऱ्या प्रा. विद्या मधुकरराव इंगोले (४७) दिलेल्या फिर्यादीनुसार, इंगोले या शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता त्या घराला कुलूप लावून महाविद्यालयात गेल्या होत्या. ही संधी साधत चोरांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील एक लाख रुपये रोख आणि डब्यातील सोन्या‍चे दागिने असा सुमारे दोन लाख ७२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. सायंकाळी सहा वाजता इ‌ंगोले घरी आल्या असता चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या प्रकरणात क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासासाठी कोठडीची मागणी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींकडून चोरीचा ऐवज हस्तगत करायचा आहे, त्यांचे आणखी कोणी साथीदार आहेत काय, त्यांनी अशा प्रकारे आणखी किती गुन्हे केले याचा तपास बाकी असल्याने आरोपींना पोलिस कोठडी द्यावी, अशी विनंती सहायक सरकारी वकील दत्तात्रय काठुळे यांनी न्यायालयाकडे केली.

बातम्या आणखी आहेत...