आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:मुलासाठी बर्थडे गिफ्ट म्हणून घेतलेल्या सेकंडहँड कारची चोरी; पळून जाताना आरोपीकडून अपघात झाल्याने वाहन सापडले

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुलाच्या वाढदिवसानिमित्त सरप्राइज म्हणून वडिलांनी सेकंडहँड चारचाकी घेतली. वाढदिवशीच ती मुलासमोर आणू असा विचार करत घराजवळील बौद्ध विहाराजवळ उभी केली. पण अट्टल वाहन चोरांनी ती लांबवली. पण चोरलेली कार घेऊन जात असताना अपघात झाल्याने चोर व कार पोलिसांना सापडली. अखेर याप्रकरणी आरोपीविरोधात सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरांकडून इतर दोन दुचाकी देखील हस्तगत करण्यात आल्या आहेत.

किलेअर्क परिसरात राहणारे विजय कचरू कांबळे यांच्या मुलाचा १५ मे रोजी वाढदिवस होता. त्याला सरप्राइज म्हणून विजय कांबळे यांनी सेकंडहँड चारचाकी १२ मे रोजी घेतली. ती थेट घरी न आणता वॉशिंग करून घराजवळील बुद्ध विहाराजवळ उभी केली. १४ मे (शनिवार) रोजी सकाळी आठच्या सुमारास कांबळे फिरायला जाण्यासाठी घराबाहेर पडले. या वेळी बुद्ध विहाराजवळ त्यांना कार दिसली नाही. त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता दोन जण रात्री दोन ते अडीचच्या सुमारास रेकी करताना त्यांना दिसले.

यानंतर तीन वाजून १० मिनिटांनी आरोपींनी कार चोरून नेल्याचेही सीसीटीव्हीत दिसून आले. ते पाहून कांबळेंनी सिटी चौक ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनीही सीसीटीव्ही तपासले, त्यातील अट्टल वाहनचोर नीरज बनकर ऊर्फ लड्डया आणि ऋतिक म्हस्के यांना पोलिसांनी ओळखले.

बातम्या आणखी आहेत...