आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:पार्श्वनाथांच्या मूर्तीची चोरी, एकाचा जामीन अर्ज नामंजूर

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कचनेर येथील जैन मंदिरातील सोन्याची दोन किलो वजनाची पार्श्वनाथ भगवंताची मूर्ती चोरणाऱ्या आरोपींपैकी एकाने सादर केलेला नियमित जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. आर. जगदाळे यांनी नामंजूर केला. अनिल भवानीदिन विश्वकर्मा (२७, रा. शहागड, जि. सागर, मध्य प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे.

आरोपीला जामीन दिल्यास तो फिर्यादी, साक्षीदार तसेच पंचांवर दबाव आणू शकतो. तो फरार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जामिनावर सोडल्यास आरोपी पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा करण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असे म्हणत सहायक सरकारी लोकाभियोक्ता नामदेव पवार आणि रंजितसिंग देवरे यांनी आरोपीच्या जामिनाला विरोध केला होता.

असे आहे प्रकरण : कचनेर येथील श्री १००८ चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराच्या गाभाऱ्यात ठेवण्यात आलेली एक कोटी पाच लाख रुपये किमतीची दोन किलो ५६ ग्रॅमची भगवंताची मूर्ती चोरून चोरांनी त्याजागी एक किलो वजनाची पितळेची मूर्ती ठेवली होती. ही बाब उघडकीस आल्यानंतर विनोद लोहाडे (५६, रा. रामतारा हाउसिंग सोसायटी, शहानूरमियां दर्गा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चिकलठाणा पोलिस ठाण्य‍ात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

भोपाळला विकली होती
पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रणाआधारे चोरट्यांचा शोध घेत मध्य प्रदेशातून आरोपी अर्पित जैन आणि त्याला मदत करणारा अनिल विश्वकर्मा याला अटक केली होती. इलेक्ट्रिक कटर व हातोड्याच्या साह्याने मूर्तीचे तुकडे केले आणि त्यातील काही भाग भोपाळ येथील एका सराफ विक्रेत्याला विकून पैसे घेत‍ल्याची कबुली चोरट्यांनी चौकशीत दिली होती.

बातम्या आणखी आहेत...