आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:सध्या लाॅकडाऊन नाहीच; रात्री 9 नंतर दुकाने बंद, उघडी दिसल्यास कडक कारवाई हाेणार : जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेराेना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना पुन्हा एकदा लाॅकडाऊन लादला जाणार असल्याच्या अफवा शहरात पसरलेल्या आहेत. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मात्र साेमवारी त्याचे खंडन केले. ‘सध्या तरी पुन्हा लॉकडाऊन लावण्याचा प्रशासनाचा विचार नाहीच. मात्र, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मेडिकल वगळता शहर व जिल्ह्यातील बाजारपेठा बुधवारपासून (१६ सप्टेंबर) रात्री ९ वाजेनंतर सक्तीने बंद करण्यात येतील,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी म्हणाले की, ‘रात्री ९ वाजेनंतर बाजारपेठेत गर्दी हाेत असल्याच्या अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. त्यामुळे नऊनंतर बाजारपेठेतील मेडिकल वगळता सर्वच दुकाने बंद करण्याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. व्यापाऱ्यांनी रात्री ८.३० वाजता दुकाने बंद करण्यास सुरुवात करावी. त्यामुळे ग्राहक, कर्मचाऱ्यांना घरी जाण्यासाठी वेळ मिळेल. ९ वाजेनंतर एखादे दुकान उघडे दिसले तर कडक कारवाई करण्यात येणार आहे.’

जनता कर्फ्यूही नाही : लॉकडाऊनमुळे कोरोनाची साखळी तोडण्यात यश मिळाले. मात्र, लॉकडाऊन हा पर्याय नाही. आता शासनाने बाजारपेठा सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्याने लॉकडाऊन शक्य नाही. प्रबोधन, जनजागृतीच्या माध्यमातून काेराेना दूर करण्याचा प्रयत्न राहील. जनता कर्फ्यू राबवणे शक्य आहे. मात्र सध्या राबवता येईल असे वाटत नाही, असेही चव्हाण यांनी सांगितले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser