आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नांदेड जिल्ह्यात आजवर एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नाही. तथापि, बुधवारी ४२ संशयितांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे बुधवारी मुंबईहून आलेल्या चौघांना क्वॉरंटाईन करण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. १२ दिवसांपूर्वी संचारबंदीदरम्यान आलेल्या या चौघांना ज्या वाहनचालकाने उदगीरमध्ये सोडले तो वाहनचालक दोन दिवसांपूर्वीच कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने धाकधूक वाढली आहे. हिंगोली जिल्हा कोरोनाचा एकही नवीन रुग्ण नाही. पूर्वी सापडलेल्या एका रुग्णावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चांगली असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले.
उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथे तीन बाधितांवर उपचार सुरू असून गेल्या २४ तासांत एकही नवीन रुग्ण आढळून आला नाही. तथापि, उस्मानाबादेत होम क्वॉरंटाईन केलेल्या एका महिलेचा बुधवारी मृत्यू झाला आहे. या महिलेचा स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आला असून ही महिला मुंबईवरून उस्मानाबादमध्ये आली होती. परभणी जिल्ह्यात बुधवारी ४८ संशयित रुग्ण दाखल झाले असले तरी अद्याप एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. आज एकूण १४४ जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले. बीड जिल्ह्यातही नवीन रुग्ण नाही. पूर्वीच्या एका रुग्णावर नगरमध्ये उपचार सुरू आहेत. तर जालन्यातही एकही नवीन रुग्ण सापडला नाही. तथापि, बुधवारी ८ जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले. पूर्वी पॉझिटिव्ह आढळलेल्या एका महिलेवर उपचार सुरू आहेत.
औरंगाबादेत दुसरी महिला काेराेनामुक्त, रुग्णालयातून डिस्चार्ज
जालना/ औरंगाबाद : जालना जिल्ह्यातील एका सारीसदृश आजाराने ग्रस्त महिलेचा बुधवारी घाटीत मृत्यू झाला. तर सध्या विलगीकरण कक्षात भरती असलेल्या कोरोना व सारीच्या प्रत्येकी एका रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, औरंगाबादेत सिडकाे एन- ४ मधील ५८ वर्षीय महिला काेराेनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात अाला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.