आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शपथपत्र दाखल:संघाच्या दहशतवादी कृत्याची न्यायालयीन चौकशी व्हावी ; सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाची मागणी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संघ परिवारात उच्च स्तरावर काम करणारे यशवंत शिंदे यांनी २००६ च्या नांदेड बॉम्बस्फोट प्रकरणातील साक्षीदार होण्यासाठी न्यायालयात शपथपत्र दाखल केले आहे. देशात विविध ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याच्या उद्देशाने संघातील उच्चस्तरीय नेते दहशतवादी प्रशिक्षण शिबिर आयोजित करत असल्याचा पुन्हा एकदा खुलासा झाला आहे. यापूर्वी अनेक दहशतवादी घटनांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाव आले आहे. देशाची एकात्मता, शांतता आणि सार्वभौमत्व धोक्यात आणण्याचे प्रयत्न संघाने केले आहेत. त्यामुळे संघ परिवाराची न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाने केली आहे.

याबद्दल माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष सय्यद कलिम बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष बी. एम. कांबळे, अशोक जाधव, सदाशिव त्रिपाठी, सईद चौधरी, अजहर तांबोळी उपस्थित होते. कलिम म्हणाले, अजमेर, समझोता एक्स्प्रेस, मालेगाव, मक्का मशीद यासारख्या कित्येक दहशतवादी प्रकरणांच्या चार्जशीटमध्ये संघाच्या इंद्रेश कुमार, असिमानंद या नेत्यांची नावे आहेत. सुरुवातीला मुस्लिमांना आरोपी म्हणून पकडले गेले, नंतर संघ परिवार त्यामागे असल्याचे उघडकीस आले. २०१४ नंतर दहशतवादी प्रकरणांमध्ये सरकारी वकील म्हणून काम करणाऱ्या वकिलांवर दबाव टाकून व केंद्रीय तपास यंत्रणा हाताशी धरून खटले कमजोर करण्यात आले. महाराष्ट्रातील विविध दहशतवादी घटनांची न्यायालयीन चौकशी व्हावी. राज्य सरकारने वेळीच या प्रकरणात पाऊल न उचलल्यास पक्षाकडून राज्य स्तरावर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

बातम्या आणखी आहेत...