आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र हे बालनाट्य स्पर्धेचे आयोजन करणारे एकमेव राज्य आहे. नाटकामुळे व्यक्तिमत्त्व विकासाला हातभार लागतो. बालपणी जे संस्कार केले जातात ते पक्के रुजतात. त्यासाठी बालनाट्याला प्रोत्साहन मिळाले पाहिजे. शालेय स्तरावर बालनाट्याचा अभ्यासक्रम असायला हवा, असे मत नाट्य समीक्षक सुधीर सेवेकर यांनी व्यक्त केले.
तापडिया नाट्यमंदिरात सोमवारी (२ जानेवारी) महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेचे उद्घाटन झाले, त्या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर नाट्यकर्मी रमाकांत मुळे, सुजाता पाठक, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सूर्यकांत ढगे उपस्थित होते. या कार्यक्रमास वैशाली पाटील, सुहास जोशी, राजेश जाधव, रूपेशकुमार परतवाघ, करण लुंगाडे जैन, किशोर थोरात, प्रसाद वाघमारे यांचीही उपस्थिती होती.
‘शाळा बंद’ नाटकातून शिक्षणाचे महत्त्व केले स्पष्ट श्रमशक्ती कलाविष्कारतर्फे लेखक सुशील बनकर, दिग्दर्शक नागनाथ काजळे यांचे ‘शाळा बंद’ हे नाटक सादर झाले. यात एक राजा दाखवण्यात आला. त्याने आपल्या राज्यातील शिक्षण बंद केले होते. अचानक हार्ट अॅटक आल्याने त्याने तत्काळ वैद्यांना बोलावले. पण राज्यात कोणीही शिकलेले नसल्यामुळे डॉक्टर नव्हते. राज्यात नोटा संपलेल्या होत्या, त्या छापण्यासाठी कारागीर नव्हते. शिक्षण बंद ठेवल्याने ही परिस्थिती झाल्याचे राजाच्या लक्षात आले. आपली चूक झाल्याचे समजताच त्याने शिक्षण सुरू केले. यातून शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. यानंतर ‘अंकुर मानवतेचा’, ‘जय हो फॅन्टसी’, ‘आदिंबाच्या बेटावर’ ही नाटके सादर झाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.