आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिवर्तनाची आस...:शाळेच्या माध्यमातून समाजिक बदलाची इच्छा हाेती... अखेर प्रयत्नांना यश आले

छत्रपती संभाजीनगर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘जैसलमेरच्या लंबगाेलाकार इमारतीमधील राजकुमारी रत्नावती विद्यालय तसे सर्वपरिचित असेल. मी ही शाळा नाॅन प्राॅफिट तत्त्वावर डिझाइन केली आहे. जूनमध्ये शाळेत अध्ययनाला सुरुवात हाेऊन वर्ष पूर्ण हाेईल. हे पाहून अभिमान वाटताे. न्यूयाॅर्कमध्ये श्रीमंतांसाठी आलिशान इमारतींची संरचना केली. परंतु समाधान नव्हते. अमेरिकन चर्चमध्ये ग्रंथालयाची संरचना तयार केली. तेव्हा दाेन दशकांचा अनुभव सामाजिक परिवर्तनासाठी उपयाेगी ठरावा. मुलींना सुरक्षित वाटेल, शांतता आणि आनंद अनुभवता येईल, असे एखादे ठिकाण असावे असे वाटायचे. मी येथील विद्यार्थिनी, शिलाई काम करणाऱ्या महिलांत प्रेरक बदल पाहिला. मी महागड्या प्रकल्पातून फायदा घेऊन पराेपकाराचे प्रकल्प करते. समाजाला परत करण्याच्या पद्धती अंतहीन आहेत. निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल. ( शब्दांकन : शिवानी व्हाेरा)

बातम्या आणखी आहेत...