आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किमान तापमान 10.1 अंश सेल्सियस:थंडीत झाली किंचित वाढ, दुपारच्या सत्रातील उकाडा मात्र कायमच

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तरेतील अतिशीत वारे वाहून आल्याने रविवारी किमान तापमान १०.१ अंश सेल्सियसवर नोंदवले गेले. सरासरीच्या तुलनेत ते १अंशाने कमी राहिले. दिवसाच्या तापमानात १ अंशाने वाढ होऊन ते ३०.६ अंशांवर गेले होते. दिवसाचे तापमान सरासरीच्या तुलनेत ३ अंशांनी जास्त राहिले. दुपारच्या सत्रातील उकाडा कायम आहे. तसेच सोमवारी तापमान स्थिर राहण्याची शक्यता आहे. बुधवारपासून थंड, उष्ण, बाष्प युक्त वाऱ्याचा आकाशात संगम होऊन ढगांची गर्दी होणार आहे. त्यामुळे तापमानात आणखी चढ-उतार होतील. वातावरणातील अस्थिर परिस्थितीचा मानवी आरोग्य आणि फळ पिकांवर दुष्परिणाम होत आहे.

बातम्या आणखी आहेत...