आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशुक्रवारी रात्री पावणेनऊ वाजता एपीआय कॉर्नर परिसरात एका व्यावसायिकावर गोळीबार झालेला असतानाच त्याच्या वीस मिनिटानंतर मुकुंदवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील छत्रपतीनगरमध्ये शिक्षक व अन्य एकावर एकाने कोयत्याने वार करून लुटल्याची घटना घडली. शिक्षक असलेले रमेश गंगाराम नरहिरे (५२) यांचे छत्रपती कॉलनी येथे घराचे बांधकाम सुरू आहे. ते तेथे उभे होते. रात्री सव्वानऊ वाजता दोघांनी त्यांच्याजवळ जात शिवीगाळ करून कोयता काढला व अंगावर वार करण्याचा प्रयत्न केला. नरहिरे यांनी बचाव करण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी सुरक्षारक्षक अशोक डरफेने हल्लेखोराला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, हल्लेखोराने सुरक्षारक्षकाच्या हातावर वार करत मारहाण करून पुढे गेले.
त्याच वेळी त्यांच्या परिसरातील प्रशांत बागुल हे दुचाकीवरून जात असताना त्यांनाही कोयत्याचा धाक दाखवून अडवले. त्यांच्या दुचाकीवर कोयत्याने वार करत त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी तेथे उपस्थित परशुराम पाटेकर यांच्या गाडीवर हल्ला करत, मारहाण करून त्यांच्या खिशातून १ हजार रुपये काढून घेत ‘तुम्ही येथे कसे राहता तेच पाहतो,’ अशी धमकी दिली. स्थानिकांनी पोलिसांना संपर्क साधल्यानंतर एकाने हल्लेखाेरामध्ये सागर वाघ असल्याचे सांगितले.
गोळीबार करणारे करमाडवरून आले शुक्रवारी एपीआय कॉर्नर येथे विलास राठोड यांच्या दुकानात गोळीबार झाला. सीसीटीव्हीमध्ये ते नारेगावमार्गे शहराबाहेर पडल्याचे समोर आले. येताना मात्र राठोड यांच्या परिचयाच्या एका सराफा व्यापाऱ्याचा पाठलाग करत ते त्यांच्या दुकानापर्यंत आल्याचा अंदाज आहे. हा व्यापारी करमाड येथून आला होता. त्याचदरम्यान गोळीबार करणाऱ्यांची कारही त्याच दिशेने शहरात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.