आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिकांचे नुकसान:शहरात मेघगर्जनेसह अर्धा तास अवकाळी पाऊस, अनेक भागात वीजही झाली गुल

छत्रपती संभाजीनगर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात सोमवारी रात्री साडेआठ वाजता मेघगर्जनेसह अर्धा तास अवकाळी पाऊस पडला. अनेक भागात वीज गुल झाली होती. या पावसामुळे गहू, हरभरा, ज्वारी आदी पिकांचे नुकसान झाले. मंगळवारीही गारपीट अन् वादळी पावसाची शक्यता आहे. सोमवारी दिवसभर आकाशात ढग घोंगावत होते. त्यामुळे कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत १ अंशाची घसरण होऊन ते ३३.७, तर किमान १६.७ अंश सर्वसाधारण तापमान राहिले. पुढील काही दिवस जेथे पोषक वातावरण राहील तेथे वादळी वारा, मेघगर्जनेसह काही वेळेतच अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

बातम्या आणखी आहेत...