आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामे:आरटीओ कार्यालयातील  6 कामे होणार घरबसल्या ; आधार कार्डला मोबाइल क्रमांक लिंक असणे आवश्यक

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आरटीओ कार्यालयाशी संबंधित लायसन्सचे नूतनीकरण, पत्ता बदल, लायसन्सचे डुप्लिकेट आदी ६ सेवा आता नागरिकांना घरबसल्या मिळणार आहेत. त्यासाठी आधार कार्डला मोबाइल क्रमांक लिंक असणे आवश्यक असून ओटीपी प्राप्त होणे महत्त्वाचे आहे. आटीओची कामे ऑनलाइन सुरू आहेत. यात सहा सेवांचे लोकार्पण परिवहनमंत्री अॅड. अनिल परब यांच्या हस्ते परिवहन आयुक्त कार्यालयात करण्यात आले. ही सेवा शहरातील आरटीओ कार्यालयातही सुरू केली आहे. सध्या आरटीओमध्ये वाहन परवाना, रजिस्ट्रेशन व अन्य परवान्यासंदर्भात ११५ सेवा दिल्या जातात. त्यापैकी ८४ सेवा ऑनलाइन केल्या आहेत. त्यामुळे ऑनलाइन अर्ज, देयक भरणे तसेच कागदपत्रे डाऊनलोड करता येतात. आता मोबाइल क्रमांक आधार कार्डशी संलग्न असेल तर ६ सेवा नागरिकांना घरबसल्या मिळणार आहेत. या ऑनलाइन सेवा मिळतात शहरातील आटीओ कार्यालयातून ऑनलाइन रजिस्ट्रेशनच्या डुप्लिकेट कॉपीकरिता अर्ज करणे, ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी), रजिस्ट्रेशनवरील पत्ता बदल, वाहनचालक परवान्याची द्वितीय प्रत काढणे, वाहनचालक परवान्यावरील पत्ता बदल, वाहनचालक परवान्याचे नूतनीकरण आदी सेवा दिल्या जातात.

बातम्या आणखी आहेत...