आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आकाशात ढग घोंगावण्याची शक्यता:तीन दिवस ढग घोंगावणार, तापमानात होतील चढउतार

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवारी शहराचे किमान तापमान ९.४ अंश सेल्सियसवर खाली आले होते. त्यात मंगळवारी किंचित १.२ अंशांनी वाढ होऊन ते १०.६ अंशावर गेले. जे सरासरीच्या तुलनेत केवळ १ अंशाने कमी तर कमाल तापमान २९.८ अंश म्हणजे २ अंशांपर्यंत जास्त राहण्याची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली आहे. दिवसभर सूर्य चांगलाच तळपत आहे. वातावरणात उष्णता टिकून राहते. त्यामुळे सौम्य थंडी जाणवते. पुढील तीन दिवस आकाशात ढग घोंगावण्याची शक्यता असल्याने तापमानात पुन्हा चढउतार होतील. या बदलत्या वातावरणाचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.

बातम्या आणखी आहेत...