आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशातील महत्त्वाच्या प्रश्नांसाठी सर्व धर्म एका व्यासपीठावर येऊन समस्या सोडवू शकतात याची प्रचिती शेतकरी कायद्यासंदर्भातील आंदोलनावेळी आली. आगामी काळात सर्वधर्म संसद देशाला नवी दिशा देईल. हा देश ज्या ध्रुवीकरणाच्या दिशेने चालला आहे ती दिशा योग्य नाही. त्यामुळे येत्या ५ वर्षांत मोठा स्फोट होईल, असे चंद्रपूरच्या ताडोबा अभयारण्यातून आलेले धृतांगधारी भिक्खू ज्ञानज्योती महास्थवीर म्हणाले.
अनागरिक धम्मपाल प्रचार समितीच्या वतीने आयोजित धम्म मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी ते शहरात आले होते. या वेळी दिव्य मराठी प्रतिनिधीने त्यांच्याशी धार्मिक, सामाजिक, राजकीय परिस्थिती आणि बदलांवर संवाद साधला, त्याचाच हा वृत्तांत भिक्खू ज्ञानज्योती म्हणाले, ‘समाजाचा बदल राजकीय, सामाजिक, आर्थिक पातळीवर घडवून आणावा लागेल ही सैद्धांतिक भूमिका डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली.
आरक्षणाचा विषय शाहू महाराजांनी मांडला, पण त्याची भूमिका डॉ. आंबेडकरांनी मांडली. थंडावलेली धम्म चळवळ आता संघटित होत आहे. अल्पसंख्याक, बहुजन एकत्र येऊन मोठा स्फोट होईल. यातून नव्या समाजाकडे भारताची वाटचाल होईल.
बुद्ध धम्म म्हणजे क्रांती
धर्माविषयी भिक्खू म्हणाले, ‘जातिव्यवस्थेच्या शोषणात संपूर्ण समाज ढवळून निघाला आहे. बुद्ध धम्म म्हणजे क्रांती आहे. युद्धाने मनुष्याची केवळ हानी झाली. त्यामुळे बुद्ध धम्म क्रांतीकडून शांतीकडे नेणारा मार्ग आहे.’
नव्याने संघटन होईल
भिक्खू म्हणाले, ‘शक्ती एकवटते आहे. लाेक एकत्र येत आहेत. नव्याने संघटन होईल. साम्राज्यशाही, ब्राह्यणशाहीचा, भांडवलशाहीचा ढाचा पाडावा लागेल. धार्मिक अल्पसंख्याकांसाठी लढा उभारावाच लागेल. यात बौद्ध धम्माची शिकवण महत्त्वाची ठरेल. तुटलेली माणसे जोडणे आणि सांप्रदायविहीन समुदाय बुद्ध धम्माचा अजेंडा आहे. बुद्धांनी सांगितलेला धम्माचा मार्ग आता वेग पकडतो आहे. पाच वर्षांत चित्र बदलेल. मिश्र सरकार येण्यास समाज महत्त्वाची भूमिका बजावेल.
लोकांना रस्त्यावर उतरावे लागेल…
भिक्खू म्हणाले, ‘राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मूलभूत अधिकारांबाबत बोलल्या. कारण त्यांनी असमानता अनुभवली आहे. पण त्या बोलताच विचित्र माहोल तयार झाला. धम्म चळवळीमुळेच उत्तर प्रदेशात ओबीसी मुख्यमंत्री द्यावा लागला. ब्राह्मणवादी इतरांना पद देतीलही, पण त्याचा कंट्रोल आपल्या हातात ठेवतात.
मतपत्रिकेच्या निवडणुकीत मतदाराला हक्क वापरता येत होता, पण ईव्हीएमने हा मूलभूत अधिकार हिरावला आहे. याविरुद्ध लोकांना रस्त्यावर उतरावे लागेल. आजपर्यंत राज्यपालांविरुद्ध माेर्चा काढायची वेळ आली नव्हती. कारण सैद्धांतिक पदावरील व्यक्तीने समतावादी राहून विवेकाने बोलले पाहीजे हा शिष्टाचार पाळता जात होता.
शिवाजी महाराज समानतेचे पुरस्कर्ते
शिवाजी महाराजांची रायगडावरील समाधी फुलेंनी शोधली. रयतेचे राजे शिवाजी महाराज समानतेचे पुरस्कर्ते होते. स्वराज्य निर्माण करताना त्यांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकीच्या धाग्यात गुंफले. हे त्यांच्या जीवनातील विविध प्रसंगात दिसते. हेच आताच्या राज्यकर्त्यांनी आत्मसात केले पाहिजे, अशी अपेक्षाही ज्ञानज्योती यांनी व्यक्त केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.