आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:कोविड रुग्णांच्या उपचारात निष्काळजीपणा चालणार नाही, प्रत्येक रुग्णांना योग्य उपचार देण्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचे आदेश

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोलीच्या कोविड रुग्णालयात रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत कोविड वॉडमध्ये मनुष्यबळ वाढवावे तसेच कोविड रुग्णांच्या उपचारामध्ये कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा चालणार नाही असा इशारा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी गुरुवारी ता. ४ दिल्या आहेत. यावेळी त्यांनी रुग्णांशी संवाद साधून त्यांना मिळणाऱ्या उपचारासाठी माहितीही घेतली.

हिंगोली जिल्हयात सध्या कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. हिंगोलीत सध्या ३२२ रुग्णांवर उपचार केले जात असून त्यापैकी २२ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यातच बुधवारी ता. ३ कोविड वॉर्डमधे स्लॅपच्या प्लास्टरचा काही भाग कोसळला. या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी जयवंशी यांनी शासकिय रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली.

कोविड वॉर्डच्या वरच्या मजल्यावरील रुग्णांची इतर वॉर्डमध्ये व्यवस्था करण्याच्या सुचना त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिल्या. या शिवाय बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने दुरुस्ती करून देण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. यावेळी त्यांनी रुग्णांशी संवाद साधला. त्यांना वेळेवर उपचार मिळतो काय तसेच वैद्यकिय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांकडून योग्य उपचार दिले जातात काय याची माहितीही घेतली. यावेळी त्यांनी रुग्णांच्या अडचणी जाणून घेतल्या.

यावेळी त्यांनी रुग्णालयाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगलेच फटकारले. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन कोरोना वॉर्डमध्ये मनुष्यबळ वाढवावे, गंभीर व अतिगंभीर रुग्णांची वेळोवेळी तपासणी करून त्यांची काळजी घ्यावी. रुग्णांसाठी पुरेशा प्रमाणात औषधीसाठा उपलब्ध असल्याची खात्री करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. कोविड रुग्णांच्या उपचाराबाबत कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी त्यांनी रुग्णालयातील व्हेंटीलेटर सुरु असल्याची खात्री करून घेतली.

खाजगी रुग्णालयाच्या लसीकरणाला भेट हिंगोलीत कोविड लसीकरण सुरु असलेल्या खाजगी रुग्णालयास जिल्हाधिकारी जयवंशी यांनी भेट देऊन पाहणी केली. कोविड लस देतांना योग्य खबरदारी घ्यावी सामाजिक अंतराचे पालन करावे. लसीकरण केलेल्या रुग्णांना पर्यवेक्षण कक्षात थांबवून त्यांच्यावर लक्ष ठेवण्याच्या सुचना जयवंशी यांनी दिल्या.

बातम्या आणखी आहेत...