आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहागंजमध्ये कारवाई:ठेकेदाराचे घर फोडून कपडे घेण्यासाठी गेले, पोलिसांनी दुकानाबाहेरच दोघांना केली अटक

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठेकेदाराचे घर फोडून मिळालेल्या रकमेचे वाटे केले. त्यानंतर शहागंजमध्ये कपडे खरेदी करण्यासाठी गेलेल्या दोन चोरांच्या पोलिसांनी दुकानाबाहेरच मुसक्या आवळल्या. रवी सुरडकर असे पकडलेल्या चोराचे नाव असून रोहित राजू घुले (१९, रा. भारतनगर) फरार झालेल्याचे नाव आहे. तिसऱ्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले.

बांधकाम ठेकेदार राजू आसाराम लोव्हाळे (४७) कुटुंबासह गारखेड्यातील आनंदनगर मध्ये राहतात. १८ जून रोजी रात्री कुटुंबासह बीड बायपास येथे राहणाऱ्या भाऊ भगवान लोव्हाळे यांच्या घरी गेले होते. त्यांना वेळ लागत असल्याने त्यांचे इतर कुटुंबीय घरी चालले गेले. दोन वाजेच्या सुमारास ते घरी पोहोचले. तेव्हा घराच्या खालच्या खोलीची कडी व कुलूप तुटलेले आढळून आले. हॉलमधील कपाटाचे कुलूप तुटलेले होते. त्यांच्या पत्नीने राजू यांना संपर्क करून हा प्रकार सांगितला. तपासणीमध्ये एक तोळा सोन्याचे कानातील झुमके, एक तोळ्याची सोन्याची अंगठी, दीड ग्रॅमच्या दोन नथी, मुलीची दीड ग्रॅमची बाळी, दोन पितळी हत्ती व सत्तर हजार रोख रुपये चोरांनी चोरून नेल्याचे समोर आले.

त्याच्या खिशात रोख रक्कम व दोन सोन्याच्या नथी असा २० हजार ३०० रुपयांचा ऐवज तर अल्पवयीन मुलाकडे एक सोन्याचा बदाम, अंगठी व रोख ५८ हजार १०० रुपये आढळून आले. दोघांना त्यांनी ताब्यात घेतले. तर तिसरा साथीदार रोहित मात्र पसार झाला आहे.

गुप्त बातमीदाराकडून माहिती याप्रकरणी तपास करताना गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अजित दगडखैर यांना गुप्त बातमीदाराने गारखेड्यात चोरी केलेले दोघे कपडे खरेदी करण्यासाठी शहागंज भागात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यांनी अंमलदार संजय नंद, अजय दहिवाल, काकासाहेब आधाने, विजय घुगे, नितीन देशमुख यांच्या मदतीने गांधी पुतळ्याजवळ सापळा रचून रवीला ताब्यात घेतले.

बातम्या आणखी आहेत...