आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाकरेंच्या जागी शिंदेंचा फोटो:ते आम्हाला गद्दार म्हणतात; आमच्या कार्यालयात त्यांचा फोटोही पाहावा वाटत नाही- संजय शिरसाट

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

''उद्धव ठाकरेंच्या जागी एकनाथ शिंदेंचा फोटो लावला हे सत्य आहे. ठाकरे जर आम्हाला गद्दारच म्हणत असतील तर त्यांचा फोटो समोर पाहावा वाटणार नाही. एकनाथ शिंदे आता आमचे नेते आहेत. त्यामुळे त्यांचा फोटो लावण्यात वावगं नाही,'' अशा शब्दांत शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी आपली रोखठोक प्रतिक्रिया 'दिव्य मराठी'शी बोलताना आज दिली.

शिवसेनेतून शिंदे सेनेत गेलेले औरंगाबादेतील आमदार संजय शिरसाट यांनी त्यांच्या कार्यालयात असलेला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो हटवत त्याजागी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावला. तसेच त्यांनी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचाही फोटो लावला, त्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

मी स्वतःचाही फोटो लावत नाही

संजय शिरसाट म्हणाले, आम्ही शिवसेनाप्रमुखांचे शिवसैनिक आहोत आणि आता आमचे नेते एकनाथ शिंदे आहेत. माझ्या कॅबीनमध्ये त्यांचा फोटो लावला मला त्यात वावगं आणि गैर वाटत नाही. मी स्वतःचाही फोटो लावत नाही.

अवघडल्यासारखे वाटते

संजय शिरसाट म्हणाले, उद्धव ठाकरे आम्हाला जर गद्दारच म्हणत असतील आणि त्यांचा फोटा आमच्यासमोर दिसत असेल तर तो पाहावा वाटणार नाही. आम्हाला त्यांचा फोटो पाहून अवघडल्यासारखेच वाटेल.

आमदार संजय शिरसाट यांच्या कार्यालयात बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचाही फोटो आहे.
आमदार संजय शिरसाट यांच्या कार्यालयात बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचाही फोटो आहे.

शिवसेनाप्रमुखांचा फोटो काढू शकत नाही

संजय शिरसाट म्हणाले, आमच्याकडे आताही शिवसेना प्रमुखांचा फोटो आहे. ते आमचे आराध्य दैवत आहे. त्यांचा फोटो मी कधीच काढू शकत नाही आणि काढणारही नाही.

मराठवाड्याला झुकते माप मिळेल

शिरसाट म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तारात मराठवाड्याला मंत्रिपद मिळतील, पण नेमकी किती मिळतील त्याबाबत मी सांगू शकत नाही. परंतु, एकनाथ शिंदे मराठवाड्याला झुकते माप देतील हे नक्की आहे.

बातम्या आणखी आहेत...