आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:डोंगरकड्यात चोरट्यांनी किराणा दुकान फोडून रोख रक्कमेसह सुकामेवा, सिगारेटचे पाकिट पळविले, पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

हिंगोली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा फाटा येथे किराणा दुकानावरील टीनपत्रे वाकवून चोरट्यांनी दुकानातील रोख रक्कम तसेच सुकामेवा व सिगारेटची पाकिटे पळविल्याची घटना रविवारी ता. ३ पहाटे घडली आहे.या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडाफाटा येथे डिगांबर लोमटे यांचे एका टीनशेडमध्ये मुख्य रस्त्यावर किराणा दुकान आहे. शनिवारी ता. २ रात्रीच्या वेळी लोमटे हे किराणा दुकानबंद करून घरी गेले होते. यावेळी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी किराणा दुकानाच्या वरील टीनपत्रे वाकवून दुकानात प्रवेश केला.यावेळी चोरट्यांनी दुकानातील साहित्याची नासधुस केली. त्यानंतर चोरट्यांनी दुकानातील रोख रक्कम तसेच काजू, बदाम, खिसमीस आदी सुकामेव्या सोबतच सिगारेटचे पाकिट पळविले.

आज सकाळी लोमटे दुकान उघडण्यासाठी आले असतांना त्यांना दुकानात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवीकांत हुंडेकर, जमादार भगवान वडकिले, प्रभाकर भोंग यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी श्‍वान पथकाला पाचारण केले होते. मात्र श्‍वान पथक चोरट्यांचा माग काढू शकले नाही. या प्रकरणात आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...