आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आखाडा बाळापूर येथील बाजारपेठेतील पाठीमागच्या बाजूला असलेल्या दुकान लाईन मधील आठ दुकाने फोडून चोरट्यांनी एक प्रकारे पोलिसांना आव्हानच दिले आहे. चोरट्यांनी दुकानांचे शटर उचकटून आत प्रवेश करून चोरी केली. मात्र नेमका किती रुपयांचा ऐवज चोरीला गेला याची अधिकृत माहिती अद्याप पर्यंत मिळालेले नाही. सोमवारी ता. २१ पहाटे ही घटना घडली आहे.
आखाडाबाळापुर पोलिस ठाणे अंतर्गत वारंगा फाटा येथे मागील आठवड्यात चोरट्यांनी पाच दुकाने फोडली होती. या घटनेचा तपास अद्यापही सुरू असतानाच चोरट्यांनी आज पहाटे आखाडा बाळापूर येथील बाजारपेठेच्या पाठीमागील दुकान लाईनची दुकाने फोडली आहेत. यामध्ये चोरट्यांनी दोन किराणा दुकान, दोन फर्टिलायझर दुकान यासह इतर दुकानांचे शटर उचकटून हात प्रवेश केला. चोरट्यांनी काही दुकानातील साहित्याची नासधूस केली. त्यानंतर दुकानातील गल्ल्यांमध्ये ठेवलेली चिल्लर रक्कम चोरून नेली. तर चोरट्यांनी एक पानटपरी फोडली. आज पहाटे संबंधित दुकान मालक दुकान उघडण्यास आले असता दुकानाचे शटर उचकटलेले आढळून आले. या घटनेची माहिती आखाडाबाळापुर पोलिसांना मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक रविकांत हुंडेकर, उपनिरीक्षक अच्युत मुपडे, जमादार संजय मार्के यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी या दुकानांच्या शेजारी असलेल्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजची तपासणी करण्यास सुरुवात केली असून यातून चोरट्यांचा शोध लावण्याचा प्रयत्न पोलिसांनी सुरू केला आहे. या प्रकरणात सध्या पर्यंत कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे नेमका किती रुपयांचा ऐवज चोरीला गेला याची अधिकृत माहिती मिळू शकली नाही. दरम्यान या घटनेमुळे आखाडा बाळापुरात एकच खळबळ उडाली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.