आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीजपुरवठा बंद:एटीएम फोडून चोरांनी केले 1.10 लाख लंपास

छत्रपती संभाजीनगर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानपुरा परिसरात एटीएम सेंटरमधील पैसे काढण्याच्या मशीनमध्ये तांत्रिक बिघाड करून चोरांनी १ लाख १० हजार रुपये लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ८ फेब्रुवारी ते ४ मार्चदरम्यान हा प्रकार घडला. एटीएममधून चोरांनी पैसे काढताना वीजपुरवठा बंद केला. यामुळे मशीनमध्ये कार्ड टाकल्यानंतर अचानक व्यवहार थांबतो. मात्र, अर्धवट आलेले पैसे हाताने पकडून ठेवत वर काढले जातात. तेव्हा एटीएममधून पैसे काढून घेतल्याची नोंद होत नाही. जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत यापूर्वी अशाच प्रकारे दोघांनी पैसे चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला हाेता.

बातम्या आणखी आहेत...