आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:औरंगाबाद शहरातील वाहनचोरांचा धुमाकूळ कायम, औद्योगिक वाळूज परिसरातून चार दुचाकी लंपास

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. मागील दोनच दिवसांत चार दुचाकी चोरीला गेल्या आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिवस-रात्र काबाडकष्ट करून बँकेचे लोन काढून कंपनीत ये-जा करण्यासाठी कामगार दुचाकी खरेदी करतात. मात्र, राहत्या घराच्या अंगणातून, कंपनीच्या पार्किंगमधून दुचाकी लंपास होत आहेत. मागील दोन दिवसांत चार दुचाकी चोरीला गेल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यात मूळ उत्तरप्रदेश येथील राहिवासी कृष्णकुमार राधेशाम भारतीय (29 रा.गट नंबर वडगाव कोल्हाटी) या तरुण कामगाराची दुचाकी 24फेब्रुवारी रोजी अंगणातून चोरीला गेल्याचे पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास निदर्शनास आले. दुचाकीचे (एमएच-20,एफबी-7242) कागदपत्रे मूळ गावी असल्याने गुन्हा नोंदवण्यास उशीर झाल्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला आहे.

दुसऱ्या घटनेत माया गोडबोले (32, रा. गुरुदक्षिणा आपारमेंट सिडको महानगर-1) यांची लाल रंगाची स्कुटी (एमएच-20, एफक्यू-4262 ही पंढरपूर येथून 23 मे रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास चोरीला गेली. तिसऱ्या घटनेत वाल्मिक निंबाळकर (46, रा.तिरुपती पार्क सिडको महानगर-1) येथील बिल्डिंगच्या पार्किंग मधून चोरीला गेल्याची घटना पहाटे 6.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

तर चौथ्या घटनेत अंगद नाटकर (रा.चिंचबन कॉलनी रांजणगाव) येथील राहत्या घराच्या अंगणात आदल्या दिवशी हँडल लॉक करून उभा केलेली दुचाकी चोरट्यांनी लॉक तोडून चोरल्याची घटना दुपारी उघडकीस आली वरील चारही दुचाकी चोरीप्रकरणी एमायडीसी वाळूज पोलीस ठाण्यात 7 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...