आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगर जिल्ह्यातील चोरट्यांचा धुमाकूळ:वाहनातील इंधन साठा लंपास करणारे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात

वैजापूर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैजापूर शहरात रात्रीच्या वेळी उभ्या वाहनातून इंधनसाठा चोरणा-या आरोपीचा छडा लावण्यात पोलीसांना यश मिळाले. योगेश तबाजी घोगळ रा.गणेश नगर ता.राहाता जि.अहमदनगर याला त्यांच्या राहत्या घरी पोलिसांनी ताब्यात घेतले.या गु्न्हयातील त्यांच्या साथीदाराचा पोलिस कसून शोध घेत आहेत. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार शहरातील साई पार्क वसाहतीत १९ जानेवारी रोजी अशोक सूर्यभान धुळे यांनी त्यांच्या घरा समोर रात्री उभी केलेल्या ट्रक मधून ३४ हजार २०० रुपये किंमतीचे ३६० लिटर डिझेल चोरी केल्याचा प्रकार सकाळी उघडकीस आला. धुळे यांनी दिलेल्या तक्रारी वरुन वैजापूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात इंधन चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपासात पोलिस काॅन्सटेबल अशोक शिंदे यांनी तपासाचे चक्र फिरवून गुप्त महिती आधारे आरोपी योगेश तबाजी घोगळ रा. गणेश नगर ता.राहता जि.अहमदनगर त्याच्या साथीदारांनी इंधन चोरीचा गुन्हा केल्याची प्राथमिक माहिती मिळाली त्यावरुन तपास अधिकारी ज्ञानेश्वर शिंदे व मदतनीस महेश बिरुटे यांनी आरोपीला ताब्यात घेतले.यातील एक आरोपी हा कोपरगाव सब कारागृहात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...