आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:स्था.संस्था निवडणुकीत आता तृतीयपंथीय लिंग निवडणार! निवडणूक आयोगाने काढला अधिकार देणारा आदेश

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत तृतीयपंथीयास लिंग निवडीचे अधिकार देणारा आदेश राज्य निवडणूक आयोगाने काढला. न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी २ जानेवारी २०२१ रोजी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने हा आदेश काढला. तृतीयपंथीयांना सामान्य नागरिकांप्रमाणे निवडणुकीत सहभागी होता येईल. त्यांना लिंग निवडीचे स्वातंत्र्य राहील. मात्र या प्रक्रियेत निवडलेली लिंग ओळख कायदेशीर तरतुदींचा अवलंब केल्याशिवाय परस्पर आणि सोयीनुसार बदलता येणार नाही. निवडणूक अर्जासोबत तसे शपथपत्र सादर करावे लागेल. या व्यक्तीला नमूद लिंग ओळखच वापरावी लागेल. खंडपीठात अंजली गुरू संजना जान विरुद्ध राज्य शासन व इतर याचिकेत न्या रवींद्र घुगे यांनी २ जाने. २०२१ रोजी दिलेल्या निकालानुसार राज्य निवडणूक आयोगाने आदेश काढला आहे. विशेष म्हणजे सपूर्ण देशात एखाद्या राज्य निवडणूक आयोगाने दिलेला या प्रकारचा पाहिला आदेश आहे.

सर्वोच्च न्यायालयानेही घेतली होती दखल : तृतीयपंथीयांना स्वतःचे लिंग ठरवण्याचा म्हणजेच स्वतःची ओळख ठरवण्याचा अधिकार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण विरुद्ध कंेद्र शासन प्रकरणात २०१४ मध्ये नमूद केले होते. २०२०-२१ च्या ग्रा. पं. निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातील अंजली गुरू संजना जान या तृतीय पंथीयाने स्त्री प्रवर्गातून निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेच्या अनुषंगाने लिंग निवडीचे स्वातंत्र्य दिले होते.

बातम्या आणखी आहेत...