आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुःखद:औरंगाबादेत कोरोनाचा तिसरा बळी, शहरातील एकूण रुग्णसंख्या 29 तर राज्यातील बळींचा आकडा दोनशेच्या पुढे 

औरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • राज्यात आज 118 नव्या रुग्णांची नोंद, एकूण रुग्णसंख्या 3320

औरंगाबादमध्ये कोरोनाचा तिसरा बळी गेला आहे. 65 वर्षीय महिलेचा घाटी रुग्णालयात सकाळी सहा वाजून 50 मिनिटांनी निधन झाले. ही महिला बिस्मिल्ला कॉलनीमध्ये राहत होती. सुरुवातीला एका खाजगी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर 13 तारखेला त्यांना घाटीत भरती करण्यात आले होते. सुरुवातीपासून या महिलेची प्रकृती गंभीर होती. दुसरीकडे 15 वर्षाचा मुलगा पॉझिटिव्ह आढळला आहे. मुलगा बायजीपुरा मधील महिलेचा मुलगा आहे

या महिलेला 16 तारखेपासून व्हेंटिलेटरवर ठेवले होते, 9 तारखेपासून महिलेला त्रास होता त्यानंतर खाजगी दवाखान्यातुन घाटीत भरती करण्यात आले होते. काल काहीशी तब्येत स्थिर होती. महिलेला मधुमेह तसेच हायपर टेन्शनचा त्रास होता अशी माहिती अधिष्ठाता डॉक्टर कानन येळीकर यांनी दिली आहे. विशेष म्हणजे यापूर्वीचा मृत झालेला पेशंटही व्हेंटिलेटरवर होता.

कोरोनाच्या संसर्गाचा वेग घटला, राज्यात 118 नव्या रुग्णांची नोंद, बळींचा आकडा दोनशेपार, एकूण रुग्णसंख्या 3320

राज्यात कोरोना संसर्गाचा वेग घटला आहे. नव्या रुग्णांची संख्या गेल्या २-३ दिवसांपासून कमी होत आहे. शुक्रवारी राज्यात ११८ नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण संख्या ३३२० वर गेली आहे.

बातम्या आणखी आहेत...