आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर:विद्यापीठाला ‘आव्हान’चे तृतीय बक्षीस

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संघाला आव्हान राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिरात तृतीय पारितोषिक मिळाले. मुंबई येथील राज भवनाच्या चॅन्सलर ब्रिगेडतर्फे आव्हान राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. जळगाव विद्यापीठात ९ ते २८ डिसेंबरदरम्यान २० दिवस शिबिर झाले. विद्यापीठ संघात ५६ मुले, ३९ मुली आणि ७ रासेयो संघप्रमुखांचा सहभाग होता. डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संघाला शोभायात्रेत तिसरा क्रमांक मिळाला. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाट, कुलसचिव डॉ. भगवान साखळे, रासेयोचे संचालक डॉ. आनंद देशमुख यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले आहे. संघप्रमुख डॉ. रवींद्र पाटील, डॉ. स्वप्ना गायकवाड, डॉ. प्रतिभा आघार्ड, प्रा. अनिल मगर यांचा संघात सहभाग होता.

बातम्या आणखी आहेत...