आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात स्थूल मुलांचे प्रमाण २.१ टक्क्यांवरून ३.४ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षणात ज्या ३३ राज्यांत मुलांमधील स्थूलता वाढली आहे, त्यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. आम्ही केलेल्या २८६ मुलांच्या सर्वेक्षणात स्थुल मुलं ३० टक्के , उच्च रक्तदाब होण्यापूर्वीच्या अवस्थेत आहेत, तर २० टक्के मुलांना उच्च रक्तदाबाची समस्या सुरू झाली आहे. त्यामुळे ही धोक्याची घंटा लक्षात घेऊन जगण्याची शैली तातडीने बदला, असा सल्ला बालस्थूलता निवारण तज्ज्ञ डॉ. प्रीती फटाले यांनी दिला. सरस्वती भुवन प्रशालेच्या माजी विद्यार्थी संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. डॉ. प्रीती यांना वर्ल्ड ओबेसिटी फेडरेशनने राष्ट्रीय फेलो म्हणून सन्मानित केले. ज्येष्ठ पत्रकार आणि शालेय समितीचे चेअरमन प्रमोद माने अध्यक्षस्थानी होते. डॉ. प्रीती म्हणाल्या, उद्याच्या जगाला आधार देणारी मुले सशक्त असणे गरजेचे आहे. आपल्या देशातही बालपणातील स्थूलपणाची पातळी चिंताजनक होत आहे. बालपणातील स्थूलतेची गुंतागुंत होऊ नये यासाठी त्याबाबत जागृती होणे गरजेचे आहे.
व्यायाम, आहार आणि सवयींची त्रिसूत्री
स्थूलता अानुवंशिकतेतून येते. तशीच ती आहाराच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव, झोपेचे बिघडलेले वेळापत्रक, मोबाइल, टीव्ही पाहण्याचे व्यसन यातूनही निर्माण होते. मात्र, व्यायाम, आहार आणि योग्य सवयी ही त्रिसूत्री पाळली तर स्थूलतेला आळा बसेल आणि पुढील गुंतागुंत टाळता येईल.
स्थूलता समृद्धी नसून आजार
स्थूलतेला समृद्धी मानण्याचा गैरसमज आपल्या समाजात आहे. मात्र, स्थूलता हा आजार उच्च रक्तदाब, हृदयरोग, यकृतविकार, मासिक पाळीतील अनियमितता, मनोविकार, मधुमेह अशा विविध आजारांना आमंत्रण देणारा आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.