आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेन्शनद्वारे महत्त्वाचा दिलासा:पीएफच्या प्रयास याेजनेचा तीस सेवानिवृत्तांना लाभ

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेवानिवृत्तीनंतरच्या पहिल्याच दिवशीपासून पेन्शन लागू झाली तर? निवृत्तीमुळे काहीसे नाराज, काहीसे अस्वस्थ होणाऱ्यांसाठी प्रयास पेन्शन योजनेद्वारे हा महत्त्वाचा दिलासा देण्यात आला. गेल्या वर्षभरात ३० निवृत्त कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला. यासाठी उद्योगांनी पुढे येण्याचे आवाहन पीएफचे क्षेत्रीय आयुक्त जगदीश तांबे यांनी केले आहे. यात गरवारे, ताज, महाराजा डिस्टिलरी या खासगी उद्योगांसोबत समर्थ साखर कारखाना, चिकलठाणा व जालना एसटी कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

निवृत्तीनंतर पेन्शनच्या पूर्ततेसाठी कर्मचाऱ्यांना शासकीय कार्यालयात चकरा माराव्या लागू नयेत या उद्देशाने प्रयास ही योजना सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी शासकीय महामंडळे आणि खासगी उद्योगांनी कर्मचाऱ्यांचा निवृत्तीच्या महिन्याच्या पेन्शनचे देयक आगाऊ भरणा करून या योजनेचा लाभ मिळवून देऊ शकतात.

बातम्या आणखी आहेत...