आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकृतीत सुधारणा नसल्याने नैराश्य:आजारामुळे तणावातून तीसवर्षीय तरुणाची गळफास घेत आत्महत्या

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तरुण वयातच मधुमेहाचा आजार जडल्याने संजय शिवाजी गवई (३०) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री समोर आली. काही महिन्यांपूर्वी त्याला मधुमेहाचा आजार जडला. उपचार घेऊनही प्रकृती सुधारणा हाेत नसल्याने ताे तणावाखाली गेला. सोमवारी सायंकाळी कुटुंबातील सदस्य बाहेर असताना त्याने गळफास घेतला. कुटुंबाने त्याला घाटीत दाखल केले. मात्र, डाॅक्टरांनी तपासून मृत घाेषित केले. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...