आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:हा आमचा विकास नाही, आमचा विकास अजून सुरू व्हायचा आहे, ज्यांना हा विकास वाटत असेल त्यांना तो लखलाभ : उद्धव ठाकरे

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. विमानतळापासून कार्यक्रम स्थळापर्यंत एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचे उपरोधिक स्वागत केले. विकासाबद्दल धन्यवाद असे पोस्टर दाखवत फुलांची उधळण केली. याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले हा आमचा विकास नाही, आमचा विकास अजून सुरू व्हायचा आहे.ज्यांना हा विकास वाटत असेल त्यांना तो लखलाभ असावा. त्याचबरोबर त्यांनी मराठवाड्यातील निजामाच्या खुणा या जनतेला जखमां सारख्या वाटतात त्या पुसून टाकायच्या आहेत.

मराठवाड्यात अनेक निजामकालीन शाळा आहे अशा दीडशे शाळांची नुतनीकरण करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर मराठवाड्यात पुढील काळात होणाऱ्या विविध विकास कामांची यादी सांगितली. त्यात प्रमुख्याने संतपीठ, शिर्डी औरंगाबाद हवाई सेवा, समृद्धीला कनेक्टेड हायवे जो हैदराबाद पर्यंत जोडल्या जाईल. त्याचबरोबर अहमदनगर औरंगाबाद रेल्वेमार्गासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत आम्ही त्यासाठी पूर्ण मदत करू. असेही सांगितले.यावेळी केंद्रीय मंत्री भागवत कराड पालक मंत्री सुभाष देसाई , बाळासाहेब थोरात, उदय सामंत, संदिपान भुमरे, आनंद देसाई, यांच्यासह स्थानिक आमदार व नेत्यांची उपस्थिती होती. एमआयएमचे खासदार सय्यद इम्तियाज जलील हे पहिल्यांदा मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमाला हजर होते.

बातम्या आणखी आहेत...