आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​शक्तीचा सन्मान:यंदा गौरींसाठी लग्नासारखी लगबग, सजीव देखावे, पंगतीचा अपूर्व उत्साह

औरंगाबाद / रोशनी शिंपीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ते देवता:’ अर्थात ज्या घरातील स्त्री सुखी, समाधानी असेल तेच घर संपन्न आणि पर्यायाने समाजसमृद्ध होते, असे शास्त्र सांगते. त्यामुळे आपल्या घरातील शक्तीचा सन्मान करणे हेच खरे लक्ष्मीपूजन, असा संदेश रविवारी घरोघरी विराजमान महालक्ष्मींनी दिला. कोरोनानंतर पहिल्यांदाच खऱ्या अर्थाने अपूर्व उत्साहात गौरीपूजन झाले. त्यामुळे घरोघरी लग्नासारखी लगबग, सजीव देखावे, दिवसभर पंगतींची रेलचेल दिसून आली. सोमवारी ८ वाजून ६ मिनिटांपर्यंत गौरी विसर्जन करता येणार आहे. धार्मिक अधिष्ठानानुसारच गौरी बसवता येतात अशी परंपरा आहे. पण मुलांची हौस आणि आईची इच्छा म्हणून सिडको एन-६ भागातील विजयालक्ष्मी पाटील, राजश्री तुरे पाटील या दोघी बहिणींनी त्यांच्या तनिष्का आणि सिया या मुलींना महालक्ष्मीप्रमाणे सजवले. या तयारीला पाहून सोसायटीतील सर्वच थक्क झाले. हुबेहूब महालक्ष्मीसारख्या दिसणाऱ्या या चिमुकल्यांचे सर्वांनीच कौतुक केले. गजाननासमोरच्या या सजीव देखाव्यातून ‘मुलगी वाचवा, मुलीच्या रूपात तुमच्या घरी देवता आली आहे अशी भावना ठेवा, मुलीवर प्रेम करा, त्यांना सन्मानाची वागणूक द्या,’ असा सामाजिक आणि स्त्री सशक्तीकरणाचा संदेश पाटील कुटुंबीयांनी दिला. दिवाण देवडी भागातील माजी नगरसेविका प्रीती तोतला यांच्या महालक्ष्मी नवसाला पावतात म्हणून या ठिकाणी रविवारी तोबा गर्दी होती. १२ वाजता आरती करून नैवेद्य दाखवण्यात आला. यानंतर ४०० ते ५०० भाविकांनी महाप्रसाद दिला.

बातम्या आणखी आहेत...