आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:यंदा 34 टक्केच शेतकऱ्यांनी काढला पीक विमा; सिल्लोड तालुक्यात मागील वर्षी पीक विम्याची भरपाई न मिळाल्याने शेतकरी उदासीन

पिंपळगाव पे.एका वर्षापूर्वीलेखक: सदाशिव फुले
  • कॉपी लिंक
  • पीक विमा भरण्याचा आज शेवटचा दिवस

मागील वर्षी म्हणजेच सन २०२० मध्ये सिल्लोड तालुक्‍यातील बहुतांश शेतकऱ्यांनी पिके हाती येतील की नाही या भीतीपोटी पीक विमा काढल्याचे कृषी विभागाच्या प्राप्त आकडेवारीवरून दिसून आले होते. मात्र पीक विमा भरण्याचे शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिलेले असतानाही तालुक्यातील फक्त ३४,२०१ शेतकऱ्यांनीच पीक विमा काढल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.

पावसाने मध्यंतरी पंधरा दिवसांची उघडीप दिल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले होते. मात्र कोरडा दुष्काळ पडतो की काय, असे बळीराजाला वाटू लागले होते. मात्र मागील दोन-चार दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या अशा पल्लवित झाल्याचे दिसून आले. मागील वर्षी सिल्लोड तालुक्यातील एक लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता.

शेतकऱ्यांना नुकसान होऊनही भरपाई मिळाली नाही. त्यामुळे या वर्षी शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. ज्ञानेश्वर जाधव पीक विमा कंपनी तालुका समन्वयक यांच्याशी संपर्क साधण्याचा संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.

पीक विमा भरण्याचा आज शेवटचा दिवस

  • 2020 मध्ये - सिल्लोड तालुक्यातील 1,16,858 शेतकऱ्यांनी 4 कोटी 65 लाख 67 हजार 649 रुपयांचा विमा काढला होता. बँकेतून 6350 शेतकऱ्यांनी विमा भरला होता तर सीएससी केंद्रातून 1,10,508 शेतकऱ्यांनी विमा भरला होता.
  • 2021 मध्ये - 14 जुलैपर्यंत तालुक्यातील फक्त 34201 शेतकऱ्यांनी 13075 रुपयांचा पीक विमा काढल्याचे दिसून आले आहे.
बातम्या आणखी आहेत...