आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा गाळप 1 ऑक्टोबरपासून:उसाचा एक टिपरूही शिल्लक राहू नये, यासाठी निर्णय घेऊ - सहकारमंत्री सावेंचा निर्धार

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा साखर कारखान्यांचे गाळप हंगाम 1 ऑक्टोबर सुरू होणार असून, शेतकऱ्यांच्या शेतातील उसाचा एक टिपरूही शिल्लक राहू नये यासाठी निर्णय घेण्यात आल्याची माहिती, सहकारमंत्री अतुल सावे यांनी दिली. ते आज औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

गेल्या वर्षी उसाने शेतकऱ्यांचे मोठे हाल होते. गाळप हंगाम संपल्यानंतरही राज्यात मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक राहिला होता. त्या पार्श्वभूमीवर 15 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एक बैठक होणार असून, 1 ऑक्टोबरपासून ऊस गाळप सुरू करावा जेणेकरून शेवटच्या टप्प्यात ऊस शिल्लक राहणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही आणि सरकारला देखील शेतकऱ्यांना भरपाई देण्याची गरज पडणार नाही, असेही सावे म्हणाले.

शेतकऱ्यांना उसाचा एफआरपी दोन टप्प्यात दिला जातो. यावर बोलताना सावे म्हणाले की, यावर आम्ही नियंत्रण आणणार आहोत. राज्यातील सर्व साखर कारखानदारांना बोलून त्यामध्ये नियंत्रण आणण्याकरिता प्रयत्न करणार आहे.

गेल्या वर्षी हाल

गेल्या वर्षी राज्यातील ऊस उत्पादन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले होते. जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत गाळप हंगाम सुरूच होता. त्यात अनेक शेतकऱ्यांचा ऊस हा 16 ते 18 महिन्यांचा झाला होता. उसाला वेळेवर तोडणी न मिळाल्याने शेतकरी संकटात सापडला होता. त्यात जवळपास सर्वच ऊस तोडणी कामगार शेतकऱ्यांकडून हवा तेवढा पैसा तोडणीसाठी उकळत होते.

सहा महिने गाळप

गेल्या वर्षी जवळपास सहा महिन्यांहून अधिक काळ ऊस तोडणी चालली होती. त्यात जून महिन्यात पावसाचे दिवस येऊन ठेपल्याने अनेक कारखान्याचे गाळप महाराष्ट्रातील ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आहे. जून अखेरपर्यंत 190 कारखान्यांपैकी 118 कारखान्यांनी गाळप बंद केले होते.

बातम्या आणखी आहेत...