आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 सप्टेंबरपासून होणार कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी:यंदा दहावी-बारावीच्या परीक्षा फक्त मुख्य केंद्रावरच होणार; शिक्षणाधिकारी एम.के.देशमुखांची माहिती

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेली दोन वर्ष कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा तेथे परीक्षा केंद्र देण्यात आले होते. यंदाच्या परीक्षेत मात्र तसे राहणार नाही. आता परिस्थिती सुधारली असून, मुख्य परीक्षा केंद्रांवरच या परीक्षा होतील. तसेच शाळा-महाविद्यालयातील भौतिक आणि शैक्षणिक सुविधांच्या बाबत येत्या 15 सप्टेंबर पासून तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी एम.के.देशमुख यांनी दिली.

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा या फेब्रुवारी-मार्च मध्ये घेण्यात येतात. गेली दोन वर्ष कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थी सुरक्षितात लक्षात घेता. या परीक्षा शाळा तेथे केंद्र या पद्ध्तीने घेण्यात आल्या होत्या. मात्र याचा गैरफायदा घेत चुकीची माहिती देवून शाळा-कनिष्ठ महाविद्यालयात परीक्षा केंद्र शिक्षण संस्थांनी मिळवले. यामुळे काही केंद्रांवर सामुहिक कॉपीचे प्रकारही उघडकीस आले. त्यामुळे खरबदारी घेत. कॉपीमुक्त परीक्षा पार पाडाव्यात या हेतूने आता परीक्षा केंद्र देतांना सर्व प्रकारची खात्री करुन आणि शाळा-महाविद्यालयात शौक्षणिक आणि भौतिक सुविधा आहेत की नाही. याची तपासणी विभागीय शिक्षण मंडळाच्या वतीने ऑक्टोंबर पासून करण्यात येईल. त्यापूर्वी शिक्षण उपसंचालक कार्यालयास तुकडीवाढीसाठी बारावीचे ४३ आणि दहावीच्या 6 नवीन प्रस्ताव आले आहेत. त्या अनुषंगाने औरंगाबादसह, बीड, परभणी, हिंगोली, जालना येथे पथक स्थापन करुन त्यांच्या मार्फत शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या वतीने १५ सप्टेंबरपासून कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी केली जाणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

अतिरिक्त प्रवेश देण्याबरोबरच केंद्र मिळवण्यासाठी चुकीची माहिती शाळा-महाविद्यालयांकडून सादर केल्याचे प्रकार मागील दहावी-बारावीच्या परीक्षेवेळी समोर आले आहेत. तर ज्या केंद्रांवर गैरप्रकार आढळून आले होते. त्यांच्यावर कारवाई करत दोन महाविद्यालयांवर कारवाई देखील करण्यात आली होती. नवीन तुकडयांसाठीचे प्रस्ताव तसे यंदा कमी आहेत. परंतु परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्रांची तपासणी विभागीय शिक्षण मंडळ तर शैक्षणिक आणि भौतिक सुविधांची तपासणी ही शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या वतीने करण्यात येणार आहे.

- एम.के.देशमुख माध्यमिक शिक्षणाधिकारी औरंगाबाद

बातम्या आणखी आहेत...