आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादहावी-बारावीची लेखी परीक्षा एप्रिल-मेमध्ये आहे. काेराेनामुळे यंदा दहावीचे विज्ञान प्रात्यक्षिक घेतले जाणार नाही. बारावीचे प्रात्यक्षिक मर्यादित स्वरूपात घेतले जाईल, अशी माहिती विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव सुगता पुन्ने यांनी दिली. राज्य मंडळाने दिलेल्या मार्गदर्शक सूचीप्रमाणे दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षेऐवजी प्रात्यक्षिकावर आधारित विशिष्ट लेखनकार्य, प्रकल्प, प्रात्यक्षिक वही अथवा गृहपाठ यांचा समावेश असेल. हे प्रात्यक्षिक २१ मे ते १० जूनदरम्यान विद्यार्थ्यांकडून शाळांनी जमा करून घ्यायचे आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयासाठी प्रकल्पाकरिता २ गुण, प्रात्यक्षिक वहीकरिता २ गुण, गृहपाठ ६ गुण असे एकूण दहा गुण असणार आहेत. २५ टक्के कमी केलेल्या अभ्यासक्रमातील प्रात्यक्षिके वगळून उरलेल्या प्रात्यक्षिकांपैकी किमान प्रात्यक्षिकाचा सराव घेऊन त्यावर आधारित ३० गुणांचे एक प्रात्यक्षिक घेण्यात यावे, असेही मंडळाने म्हटले.
बारावीचे हॉलतिकीट ३ एप्रिलपासून मिळणार
औरंगाबाद | बारावीच्या लेखी परीक्षेस २३ एप्रिलपासून सुरुवात होत आहे. या परीक्षेचे हॉलतिकीट ३ एप्रिलपासून कॉलेजच्या लॉगइन आयडीवरून डाऊनलोड करून प्रिंट काढता येईल. विद्यार्थ्यांनी यावर मुख्याध्यापक अथवा प्राचार्यांची स्वाक्षरी व शिक्का मारून घ्यावा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.