आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्बंधमुक्त उत्सव:यंदाचा गणेशोत्सव जल्लोषातच, मनपा, पोलिस प्रशासनाची तयारी युध्दपातळीवर

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लहाणग्यांपासून ते वृध्दांपर्यंत सर्वांच्या लाडक्या गणपती बप्पाचे ३१ ऑगस्ट रोजी आगमन होत आहे. मागील दोन वर्षे कोरोनामुळे निर्बंधयुक्त गणेशोत्सव साजरा करावा लागला. यंदा मात्र नेहमीप्रमाणे जल्लाेषात हा उत्सव साजरा केला जाणार असून मनपा व पोलिस प्रशासानाने युध्दपातळीवर यासाठी तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्र्यांने घोषित केल्याप्रमाणे यंदा ऑनलाईन पध्दतीने अर्ज करुन एकाच ठिकाणी परवानगी मिळणार असून महाराष्ट्र पोलिसांच्या संकेतस्थळावर याची सुरवात झाली आहे. ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर दरम्यान गणेशोत्सव पार पडेल. दोन वर्षे अत्यंत साधेपणाने हा उत्सव पार पडला. यंदा मात्र निर्बंधमुक्त उत्सव साजरा होणार असल्याने तो शांततेत व्हावा, यासाठी पोलिस प्रशासनाने कंबर कसली आहे. राज्याच्या प्रशिक्षण व विशेष पथकाचे पोलिस महासंचालक संजय कुमार नुकतेच त्या अनुषंगाने दौऱ्यावर होते. जिल्हा पोलिसांसह त्यांनी शहर पोलिसांच्या गणेशोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला. त्यात पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, उपायुक्त अपर्णा गिते, उज्जवला वनकर आणि दिपक गिऱ्हे यांची उपस्थिती होती. यात प्रामुख्याने पंधरा मुद्द््यांवर चर्चा झाली.

पोलिस महासंचालक संजयकुमार यांच्याकडे यावेळी गुप्ता यांनी अतिरीक्त २ पोलीस उपायुक्त, ३ सहायक आयुक्त, १० निरीक्षक, ३०० पोलीस कर्मचारी, ५०० होमगार्ड आणि एसआरपीएफच्या ४ कंपन्यांची मागणी केली आहे. यंदा सोसायट्यांनाही नोंदणी करावी लागेल : सोसायट्यांमध्ये साजरे होणारे सामुहिक गणपती उत्सवाची मात्र नोंद होत नाही. त्यामुळे सोसायट्यांना देखील सामुहिक गणेशोत्सवाची माहित संबंधित पोलिस ठाण्यात करावी, असे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. निखित गुप्ता यांनी केले आहे. नागरिकांना कुठलिही शंका असल्यास, मदत लागल्यास, काही माहिती द्यायची असल्यास त्यांनी संबंधित ठाणे, नियंत्रण कक्ष किंवा ११२ वर मदत मागावी, असे गुप्ता म्हणाले.

अशी करा ऑनलाईन नोंदणी
https://citizen.mahapolice.gov.in/Citizen/MH/index.aspx या संकेतस्थळाला भेट द्या.
मदतीसाठी येथे संपर्क करा : पोलिस उपायुक्त परिमंडळ १ कार्यालय, पैठणगेट वाहनतळ { पोलिस उपायुक्त परिमंडळ १ कार्यालय, सेंट्रल नाका स्मशानभुमी समोर { सहायक पोलिस आयुक्त कार्यालय, उस्मानपुरा, ज्योतीनगर { सहायक पोलिस आयुक्त कार्यालय, छावणी येेथे मदत केंद्रे उभारण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...