आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • This Year's Lifetime Achievement Award Ramesh Bhandari, Senior Organizer Of 'Kho Kho' | The Glory Ceremony Will Be Held Tomorrow At Sant Eknath Rangmandir

'खो-खो'चे ज्येष्ठ संघटक रमेश भंडारी यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार:उद्या संत एकनाथ रंगमंदिरात पार पडणार गौरव सोहळा

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने औरंगाबाद जिल्हा ऑलिम्पिक संघटनेतर्फे खेळासाठी योगदान देणाऱ्या खेळाडू, क्रीडा शिक्षक आणि संघटकांचा गौरव करण्यात येतो. यंदाचा संघटनेचा जीवनगौरव पुरस्कार खो-खो खेळाचे ज्येष्ठ संघटक रमेश भंडारी यांना प्रदान करण्यात येणार आहे.

हा गौरव सोहळा रविवारी (ता. 28) सकाळी 9 वाजता संत एकनाथ रंगमंदिर येथे होणार आहे. यावेळी राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे आँलिम्पियन रोइंग खेळाडू तथा अर्जुन पुरस्कार प्राप्त दत्तू भोकनळ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमात जिल्हाभरातील विविध राष्ट्रीय खेळाडूंचा देखील गौरव होणार आहे.

पुरस्कारार्थी पुढील प्रमाणे:

आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार - डॉ. निलेश गाडेकर (सोयगाव), निलेश गायकवाड (पैठण), बाबासाहेब माने (सिल्लोड), विजय बारवाल (कन्नड), भाऊसाहेब खरात (वैजापूर), नामदेव पवार (फुलंब्री), कैलास वाहूळे (औरंगाबाद), राजेंद्र गंगावणे (खुलताबाद), निलेश माने (गंगापूर).

सत्कारमूर्ती आंतरराष्ट्रीय खेळाडू :

आदिती निलंगेकर (पॅरा ऑलिम्पिक), सृष्टी साठे (सुवर्ण पदक, आशियाई कनिष्ठ बॉक्सिंग स्पर्धा), शर्वरी कल्याणकर (सुवर्ण पदक, आशियाई कनिष्ठ बॉक्सिंग स्पर्धा), तनिषा बोरामणीकर (रौप्य पदक, आशियाई बुद्धिबळ स्पर्धा), गौरव म्हस्के (कांस्य पदक, आशियाई ज्युनियर बॉक्सिंग स्पर्धा), कशीष भराड (आशियाई तलवारबाजी स्पर्धा), वैदेही लोहिया (आशियाई तलवारबाजी स्पर्धा), साक्षी चितलांगे (रौप्य पदक, आशियाई बुद्धिबळ स्पर्धा), तेजस शिरसे (आशियाई अँथलेटिक्स स्पर्धा), रिद्धी हत्तेकर, सिद्धी हत्तेकर (आशियाई जिम्नॅस्टिक स्पर्धा), अभय शिंदे (आशियाई तलवारबाजी स्पर्धा), श्रेयस जाधव (आशियाई तलवारबाजी स्पर्धा), संदीप गुरमे (हाफ आयर्नमॅन) यांच्यासह विविध खेळांतील राष्ट्रीय खेळाडू, क्रीडा मार्गदर्शकांचा देखील सत्कार केला जाणार आहे.

उपस्थित राहण्याचे आवाहन

या कार्यक्रमाला जास्तीत जास्त क्रीडाप्रेमींनी उपस्थित राहावे असे, आवाहन औरंगाबाद जिल्हा ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, उपाध्यक्ष डॉ. उदय डोंगरे, सचिव अँड. गोविंद शर्मा, सहसचिव डॉ. दिनेश वंजारे, कोषाध्यक्ष विश्वास जोशी आदींनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...