आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:खोटे दस्तऐवज बनवून इमारत हडपण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा जामीन फेटाळला

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवशंकर कॉलनी तानाजी चौक येथील जितेंद्र चावडा यांच्या दुमजली इमारतीचे खोटे दस्तऐवज बनवून ती हडपण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मुख्य आरोपी दिलीप श्रीहरी राऊत यास ९ महिन्यांनंतर अटक करण्यात पोलिसांना यश आले. राऊतसह खटल्यात ८ आरोपींवर गुन्हा दाखल आहे. त्याने दाखल केलेला जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश वर्षा पारगावकर यांनी फेटाळला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या निर्णयाला आरोपीच्या वतीने सत्र न्यायालयात आव्हान दिले होते.

खटल्यात दिलीप राऊत, पत्नी सविता राऊत, मधुर दिलीप राऊत, सायली दिलीप राऊत, रमेश बाळाराव सद‌्गुरे, गजानन पांडुरंग कुटे, अंकुश केशवराव भिसे, योगेश साहेबराव फाटके यांच्याविरुद्ध न्यायालयाने भादंवि कलम ४२०, ४६५, ४६६, ४६७, ४६८, ४७१, १२० (ब), ३४ नुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. तक्रारदार चावडा यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची विनंती केल्यानंतर न्यायालयाने यासंबंधी आदेश पारित केले. हस्तक्षेप अर्ज दाखल करून अॅड. निरंजन प्रकाश पांडे यांनी प्रस्तुत प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. अशाच प्रकारचा एक गुन्हा आरोपीविरुद्ध जवाहरनगर ठाण्यात प्रलंबित असल्याचे निदर्शनास आणून दिले. युक्तिवादानंतर न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला. प्रकरणात अॅड. निरंजन पांडे यांना अॅड. सागर शिंदे, अॅड. बी. मोहित, अॅड. माधुरी शहाणे यांनी साहाय्य केले.

बातम्या आणखी आहेत...