आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपींच्या कोठडीत वाढ:मित्राच्‍या जमीनीची साफसफाई करण्‍यासाठी गेलेल्यांना रॉड आणि काठ्यांनी मारहाण

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ,

औरंगाबाद निपाणी शिवारातील गट क्रं.141 मधील मित्राच्‍या जमीनीची साफसफाई करण्‍यासाठी गेलेल्या पाच ते सहा जणांवर चाकू, तलवार, लोखंडी रॉड आणि काठ्यांनी मारहाण करुन जीवे मारण्‍याचा प्रयत्‍न झाला. या प्रकरणी संशयित आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांच्या पोलिस कोठडीत 20 जूनपर्यंत वाढ करण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी शाहिद साजीदुज्जूमॉ यांनी शनिवारी (ता.18) दिले.

या प्रकरणात संशयित आरोपीचे नाव मुकुंद नानासाहेब भालेकर (35 , रा. निपाणी ता.जि. औरंगाबाद) असे आहे. या प्रकरणात गंभीर जखमी शितल कल्याणमल पहाडे (48, रा. ब्ल्युबेल हा.सो, प्रोझोन मॉल जवळ) यांनी फिर्याद दिली. त्‍यानूसार, फिर्यादीचे मीत्र रहेमान भाई यांचे निपाणी शिवारातील गट क्रं. 141 मध्‍ये शेत आहे. 23 मार्च रोजी फिर्यादी हे मीत्र साहिल ऊर्फ रहेमान अब्दुल शेख, अजय ढोकळे, आदिल हिल्लाबी असे पाच सहा जण रहेमान भाई यांच्‍या शेताची साफसफाई करण्‍यासाठी कारमध्‍ये गेले होते. तेथे फिर्यादी व त्‍यांच्‍या मित्रांना आरोपी मनोज भालेकर, सचिन पळसकर, अजय पळसकर व इतर आठ जणांनी तलावर, चाकू, लोखंडी रॉड आणि काठ्यांनी मारहाण करुन गंभीर जखमी केले. प्रकरणात चिकलठाणा पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

आरोपीच्‍या कोठडीची मुदत संपल्याने त्‍याला न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील रविंद्र असरमोल यांनी आरोपीच्‍या साथीदारांना अटक करुन त्‍यांनी गुन्‍ह्यात वापरलेली हत्‍यार आणि वाहने जप्‍त करायची असल्याने आरोपीच्‍या कोठडीत वाढ करण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.

बातम्या आणखी आहेत...