आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिंदे गटाकडून गर्दीसाठी प्रत्येकी हजार रुपये!:गद्दारांशी काय बरोबरी करायची? शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंचा आरोप

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येकी एक हजार रुपये देऊन शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी माणसे नेली जात असल्याचा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंनी केला आहे. त्यांनी कितीही गर्दी जमवली तरी पैसे देऊन गर्दी जमवण्यात काहीही अर्थ नाही असे खैरेंनी म्हटले आहे.
प्रत्येकी 1 हजार रुपये
शिंदे गटाचे आमदार गद्दार आहेत. ते दसरा मेळाव्यासाठी पैसे देऊन गर्दी जमवत आहेत. प्रत्येकी एक हजार रुपये देऊन मेळाव्यासाठी माणसे नेली जात आहे असा आरोप चंद्रकांत खैरेंनी केला आहे. शिवसैनिकांसोबत त्यांची बरोबरी होऊ शकत नाही.
गर्दी जमवण्यासाठी 52 कोटी खर्च
शिंदे गटाकडून मेळाव्यासाठी औरंगाबादमधून 500 गाड्या सोडण्यात आल्याच्या मुद्द्यावर बोलताना खैरे म्हणाले की, गद्दारांशी काय बरोबरी करायची? त्यांनी 52 कोटी रुपये त्यांनी खर्च केले. त्यांच्या मेळाव्याला तीन काय पाच लाख लोकं आले तरी ते पैसे देऊन गर्दी जमवत आहेत. हे गद्दार उद्धव ठाकरेंना त्रास देण्यासाठी पाप करत आहेत. ठाकरे साहेब त्यांचा समाचार घेतील असे खैरे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...