आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील किराडपुरा भागात झालेल्या दंगलीतील आणखी तीन आरोपींच्या विशेष तपास पथकाने मुसक्या आवळल्या. त्यांना १० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. एम. माळी यांनी शुक्रवारी (७ एप्रिल) रोजी दिले. सलमान खान हारुण खान (२४, रा. गणेश कॉलनी), शेख फैजान शेख मेहराज (२०, रा. किराडपुरा) आणि शेख सर्फराज शेख शफिक (रा. रहेमानिया कॉलनी) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील शशिकांत इघारे यांनी न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाने ती मान्य करत पोलिस कोठडी सुनावली.
आठ जणांना न्यायालयीन कोठडी : या प्रकरणातील सय्यद शहेबाज सय्यद जिलानी, शेख कलीम शेख सलीम शेख सोहेल शेख ख्वाजा, आमेर सोहेल लतीफ खान, अल खुतूब हबीब हमद, हबीब हसन हबीब उमर, राशेद दीप सालमीन दीप, सोहेल खान अमजद खान या आठ जणांना न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
ओव्हर दंगलीतील आठ जणांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला छत्रपती संभाजीनगर | जटवाडा रोडवरील ओव्हर गावात बॅनर फाडल्याप्रकरणी दोन गटांत झालेल्या दंगल प्रकरणातील आठ आरोपींचा नियमित जामीन अर्ज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. एम. माळी यांनी शुक्रवारी फेटाळून लावला. भास्कर लिंबाजी पिठोरे (२६), अजय दीनानाथ भालकर (३४), मोसीन खान मोईन खान पठाण (३३), मुजफ्फर मन्सूर पठाण (२५), फयाज हारुनखाँ पठाण (१९), मोसीन रशिदखाँ पठाण (२२), मुस्तकिन नसीरखाँ पठाण (३२) आणि खान समीर अकबर ऊर्फ एमडी समीर (२३, सर्व रा. ओव्हरगाव) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या साथीदारांना अटक करायची आहे. गुन्ह्यात वापरलेली हत्यारे हस्तगत करायची आहेत. आरोपींना जामीन दिल्यास पुन्हा दंगल उसळण्याची शक्यता नाकरता येत नाही, असे म्हणत सहायक सरकारी वकील शशिकांत इघारे यांनी आरोपींच्या जामीन अर्जाला विरोध केला होता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.