आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयटीआय प्रवेश:एका जागेसाठी तिघांचे अर्ज ; गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थी कमीच

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) अंतर्गत विविध ट्रेडसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून पहिल्या फेरीला सुरुवात झाली. औरंगाबाद आयटीआयच्या १,०२८ जागांसाठी ३,७२० विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चित केले आहेत. पहिल्या फेरीसाठी पात्र विद्यार्थ्यांनी ३ ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चित करावा. राज्यातील शासकीय आयटीआयसाठी गेल्या वर्षी ९३,७६८ अर्ज होते. मात्र, यंदा ९३,६८० जणांचे अर्ज आले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यातील अर्जदारांची संख्या घटली आहे. अर्जांतील त्रुटींमुळे राज्यभरात सुमारे लाखभर विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी पूर्ण न केल्याने ही संख्या घटल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दहावीचे निकाल लागल्यानंतर आयटीआय प्रवेश प्रक्रियेला वेग आला. कमी कालावधी आणि अल्प खर्चात रोजगारासह स्वयंरोजगाराच्या संधी मिळत असल्याने शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थी आयटीआयला प्राधान्य देतात. इतर अभ्यासक्रमांच्या तुलनेत आयटीआय प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद मिळतो. पहिल्या फेरीत अर्ज भरताना दिलेल्या पर्यायांत पसंतीचा पहिला पर्याय मिळाल्यास विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करणे अनिवार्य आहे. अन्यथा चौथ्या प्रवेश फेरीतून बाद होतात. दुसरा पर्याय मिळाला असेल तर विद्यार्थी पुढील फेरीसाठी पात्र ठरतील. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी http://admission.dvte.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे अावाहन करण्यात आले.

पहिल्या फेरीसाठी ६५० विद्यार्थ्यांना मिळाली अलॉटमेंट
औरंगाबाद आयटीआय प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद आहे. १०२८ जागांसाठी ३७२० अर्जदारांनी अर्ज निश्चित केले, तर ६५० जणांना पहिल्या फेरीसाठी अलॉटमेंट मिळाली आहे. बऱ्याचवेळा विद्यार्थी अर्ज निश्चित करत नाही. त्यामुळे त्यांची प्रक्रिया पूर्ण होत नाही. मात्र, फेरीतील पात्र विद्यार्थ्यांनी पहिल्या पसंतीला प्रवेश घेणे अनिवार्य आहे. अन्यथा ते चौथ्या फेरीपर्यंत बाद होतील.

-अभिजित आलटे, प्राचार्य

बातम्या आणखी आहेत...