आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सट्टा:आयपीएल मॅचवर सट्टा घेणाऱ्या तीन जणांना अटक

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा घेणाऱ्या तिघांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. ही कारवाई १० मे रोजी रात्री १० वाजता महलक्ष्मीनगर, जुना बीड बायपास रोड, चिकलठाणा परिसर येथे करण्यात आली. पोलिसांनी शुभम संजय पांडे (२३, रा. ब्राह्मणगल्ली, बेगमपुरा), राजेश विक्रम गावंदे (३६, रा. चुनाभट्टी, खोकडपुरा) आणि राजेश सुधाकर पुंड (५१, रा. बन्सीलालनगर) या आरोपींना अटक केली. त्यांच्या ताब्यातून एक कार, ९ मोबाइल, वायफाय, ८,९५० रोख आणि हिशेबाची वही जप्त केली.

गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक महांडुळे यांना आयपीएलच्या लखनऊ जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स या संघात १० मे रोजी होणाऱ्या सामन्यावर एका कारमध्ये तिघे जण सट्टा घेत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून पथकाने छापा मारून शुभम पांडे, राजेश गावंदे आणि राजेश पुंड या तिघांना पकडले. ते तिघेही एका शटरच्या गोडाऊनमध्ये कारमध्ये बसून आयपीएल सामन्यावर सट्टा घेत होते. या कारवाईत कार, मोबाइल आणि रोख रकमेसह ४ लाख १९ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...