आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण:कंपनीच्या अधिकाऱ्यांना मारहाण तिघांवर गुन्हा ; चित्रीकरण करण्यास सुरुवात

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील संग्राम ऑटो कंपनीत कामगारांवर लावलेल्या चौकशीप्रकरणी व्यवस्थापनासोबत चर्चा करण्यासाठी गेलेल्या बचाव प्रतिनिधीने मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे कंपनी व्यवस्थापन व कामगारांत शाब्दिक चकमक झाली. यात पुढे कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांना शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी कंपनीचे अधिकारी शिवाजी मोहिते यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात युवा कामगार संघटनेचे संतोष साहेबराव दळवी व इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर संतोष दळवी यांनी पोलिस आयुक्त कार्यालयात धाव घेत कंपनी व्यवस्थापनाविरुद्ध तक्रार अर्ज दिला. कंपनीतील कामगार संदीप भीमराव पवार, परमेश्वर पुंजाराम नन्नवरे यांना कंपनी व्यवस्थापनाने दिलेल्या नोटिसाबाबत बाजू मांडण्यासाठी बचाव प्रतिनिधी म्हणून संतोष दळवी यांना बोलावले होते. दरम्यान, सोमवारी दळवी सहकाऱ्यांना घेऊन हजर झाले होते. दुपारी २ वाजता दळवी मोबाइलमध्ये कंपनीच्या आतील चित्रीकरण करत असल्याने त्यांना मोहिते यांनी मज्जाव केला. या वेळी संतप्त झालेल्या संतोष दळवी यांनी मोहितेंना शिवीगाळ करून कंपनी बाहेर आल्यानंतर पाहून घेऊ, अशी धमकी दिली. दरम्यान, सायंकाळी मोहिते व एचआर विभागातील कमलेश चव्हाण दुचाकीवरून घरी जाण्यासाठी निघाले असता, नगर रोडवरील साऊथ सिटीजवळ ६.३० वाजता बुलेट (एमएच २०, एफएच ८०७२) वर आलेल्या दोन अनोळखींनी चव्हाण यांची दुचाकी अडवून त्यांना शिवीगाळ व मारहाण केली. याप्रकरणी ७ जून रोजी चव्हाणच्या तक्रारीवरून संतोष दळवीसह इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...