आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणी:वाण नदीत पोहण्यास गेलेली तीन मुले बुडाली; एकाचा मृतदेह सापडला, इतरांचा शोध सुरू

परभणी2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोनपेठ तालुक्यातील निमगाव जवळून वाहणार्‍या वाण नदीच्या पात्रात पोहण्याकरिता गेलेली तीन मुले शुक्रवारी (दि. 16) दुपारी पाण्यात बुडाली. सायंकाळी एका मुलाचा मृतदेह सापडला असून अन्य दोघांचा शोध उशिरा पर्यंत सुरू होता.

निमगाव येथील येथील शुभम् सुरेश मुळे (वय सहा), शिवकन्या सुरेश मुळे (वय 14, दोघे रा. निमगाव) ही दोन भावंडे तसेच सचिन संभाजी घोडके (वय 20) असे तिघे जण वाणनदीच्या पात्रात दुपारी दोनच्या सुमारास पोहण्याकरिता गेले होते. परंतु हे तिघे नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने पोहताना बुडाले. प्रत्यक्षदर्शींनीस तो प्रकार निदर्शनास आल्याबरोबर मदतीसाठी धावाधाव केली. काहींनी पाण्यात उतरून त्यांचा शोध सुरू केला. तेव्हा शुभम् या मुलाचा मृतदेह हाती आला. सायंकाळी उशिरा अन्य दोघांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांनी दिली.

यावेळी सोनपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी धावून गेले. त्यांनी मदत कार्यास वेग दिला. यावेळी ग्रामस्थांनीही मोठी मदत केली. या घटनेने गावासह तालुक्यात मोठी शोककळा पसरली आहे.

बातम्या आणखी आहेत...