आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्रिसूत्रीवर आधारित कार्यक्रम:मूत्रपिंड प्रत्यारोपणावर उद्यापासून तीनदिवसीय परिषद; अडीचशे युरॉलॉजिस्ट सहभागी होणार

औरंगाबाद7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादमध्ये २५ ते २७ नोव्हेंबरदरम्यान मूत्रपिंड प्रत्यारोपणावरील राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. युरॉलॉजी सोसायटी ऑफ इंडिया, वेस्ट झोन युरॉलॉजी सोसायटी ऑफ इंडिया आणि औरंगाबाद युरॉलॉजी संघटनेतर्फे केटीकॉन-२०२२ कार्यशाळा होत आहे. ‘बघा, शिका आणि शिकवा’ या त्रिसूत्रीनुसार तीन दिवस लाइव्ह ऑपरेशन आणि त्यावर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे, अशी माहिती संयोजन समितीचे सरचिटणीस डॉ. अजय ओसवाल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये २५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६.३० वाजता कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे. देश-विदेशातून आलेले तज्ज्ञ धूत हॉस्पिटलमध्ये प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करणार अाहेत. त्याचे थेट प्रक्षेपण कार्यशाळेत सहभागी मूत्रशल्यचिकित्सकांना बघता येणार आहे, अशी माहिती डॉ. पळणीटकर यांनी दिली.

किडनीसाठी प्रतीक्षा: निवासी डॉक्टरांसाठी पोस्टर प्रदर्शन, शोधनिबंध वाचन, प्रश्नमंजूषा स्पर्धा होणार आहे. अमेरिकेनंतर भारतात सर्वात जास्त मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया होतात. शासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रयत्नांमुळे मूत्रपिंड दानाचे प्रमाण वाढले तरी अद्यापही हजारो रुग्ण किडनी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मूत्रपिंड दानाच्या संदर्भातील गैरसमज दूर व्हावेत, ब्रेनडेड रुग्णांच्या अवयवदानाविषयी जागृती व्हावी, असे डॉ. अजय ओसवाल म्हणाले.

तज्ज्ञ डॉक्टर करणार लाइव्ह मूत्रपिंड शस्त्रक्रिया महाराष्ट्र शासन किडनी ट्रान्सप्लांट अप्रोप्रिएट अथॉरिटीने शस्त्रक्रिया करण्यास परवानगी दिली. चार ते पाच गरजू रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका आणि भारतातून प्रतिनिधी येणार आहेत. युरॉलॉजी सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. आर. बी. सबनीस, लखनऊचे डॉ. अनिश श्रीवास्तव, कॅडवरिक डोनर ट्रान्सप्लांटमध्ये ज्यांचे मोठे काम आहे असे चेन्नईचे डॉ. सुनील श्रॉफ, अहमदाबादचे डॉ. जमाल रिझवी, मुंबईचे डॉ. फिरोज सुनावाला, इंदूरचे डॉ. चंद्रशेखर थत्ते, औरंगाबादचे डॉ. अजय ओसवाल शस्त्रक्रिया करतील.

बातम्या आणखी आहेत...